नाशिकच्या पथकाकडून अकरा जणांचे जबाब
By admin | Published: October 28, 2015 12:05 AM2015-10-28T00:05:55+5:302015-10-28T00:05:55+5:30
अजिंठा विश्रामगृहात जाबजबाब : दहा तास चालली चौकशी
Next
अ िंठा विश्रामगृहात जाबजबाब : दहा तास चालली चौकशीजळगाव: पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्येप्रकरणी दाखल गुन्ाच्या तपासासाठी नाशिक आयुक्तालयातील सहायक आयुक्त विजयकुमार चव्हाण यांचे पथक मंगळवारी पुन्हा जळगावात दाखल झाले. अजिंठा विश्रामगृहात त्यांनी रामानंद नगरच्या अकरा पोलीस कर्मचार्यांचे जबाब घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. दुपारी बारा वाजेपासून ते रात्री दहा वाजेपर्यंत दहा तास या जबाब नोंदविण्याचे कामकाज सुरू होते.तपासाधिकारी विजयकुमार चव्हाण, पोलीस निरीक्षक नरेंद्र पिंगळे यांच्यासह पाच जणांचा या पथकात समावेश होता. याआधी १७ ऑक्टोबर रोजी चव्हाण यांचे पथक जळगावात आले होते. मंगळवारी दुपारी हे पथक पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल झाले. थोडा वेळ थांबून पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक व स्थानिक गुन्हे शाखेकडून काही कागदपत्रे घेतली. त्यानंतर रामानंद नगर पोलीस स्टेशनला जाऊन आवश्यक ती माहिती घेऊन थेट अजिंठा विश्रामगृह गाठले.यांचे नोंदविले आहेत जबाब सादरे यांनी वाळूच्या डंपरवर कारवाईसाठी ज्या कर्मचार्यांना पाठविले होते ते राजेंद्र उगले,अनिल फेगडे, किरण पाटील, शैलेश चव्हाण, ललित भदाणे, ज्ञानेश्वर वाघ, सुनील पाटील, शशिकांत महाले, गोपाल बेलदार, हितेश बागुल, सुधाकर शिंदे आदींचे जबाब नोंदविले आहेत. ठाणे अमंलदाराचीही त्यांनी चौकशी केली. त्या दिवशी कोणत्या कर्मचार्याला काय सांगण्यात आले, त्यांनी काय केले. पोलीस स्टेशनला कोण आले. सादरेंनी खरोखर धमकी दिली का? यासह अनेक प्रश्न विचारुन त्यांचे जबाब नोंदवून घेतले.सागरची कुंडली मागविलीसागर चौधरी याने जिल्ात कोणाविरुध्द केव्हा व काय तक्रार केली आहे. तसेच त्याच्याविरुध्द जिल्ात कुठे व काय तक्रारी, गुन्हे दाखल आहेत याची माहिती त्यांनी मिळविण्याचा प्रयत्न केला, मात्र ही माहिती एका दिवसात मिळणे शक्य नसल्याने दोन ते तीन दिवसात उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. अजिंठा विश्रामगृहावर जबाब सुरू असताना दोन कर्मचारी दुपारी पोलीस अधीक्षक कार्यालयात कागदपत्रे घेण्यासाठी आले होते. संध्याकाळीही काही कर्मचार्यांनी रामानंद नगरला जाऊन माहिती घेतली.