फुकट देऊन भागले! आता दिल्लीत मोफत वीजेसाठी नवा नियम; केजरीवालांनी टाकली पहिली अट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 02:00 PM2022-09-14T14:00:32+5:302022-09-14T14:01:42+5:30

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज मोठी घोषणा केली. तसंच त्यांनी सांगितलेली अट आजपासूनच लागू होणार आहे.

elhi cm arvind kejriwal electricity subsidy in delhi need to fill form know details | फुकट देऊन भागले! आता दिल्लीत मोफत वीजेसाठी नवा नियम; केजरीवालांनी टाकली पहिली अट

फुकट देऊन भागले! आता दिल्लीत मोफत वीजेसाठी नवा नियम; केजरीवालांनी टाकली पहिली अट

googlenewsNext

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोठी घोषणा केली आहे. दिल्लीतील लोकांना मिळणाऱ्या मोफत वीजेसंदर्भात त्यांनी मोठा निर्णय घेतलाय. जे लोक आता अर्ज करतील त्याच दिल्लीकरांना आता वीजेवर अनुदान मिळणार आहे. आजपासूनच याची प्रक्रियाही सुरू करण्यात आलीये.

काही लोकांना मोफत वीज नकोय. अशात आता दिल्लीत त्याच लोकांना वीजेवर अनुदान देण्यात येईल, जे यासाठी अर्ज करतील, असं अरविंद केजरीवाल म्हणाले. “दिल्लीत यापू्रीव मोठ्या प्रमाणात लोड शेडिंग होतं. आम्ही ते ठीक केलं. आता २४ तास वीज मिळत आहे. दिल्लीत मोफत वीज मिळतेय. भ्रष्टाचार थांबवून जो पैसा वाचवला त्यातून लोकांना सुविधा दिल्या जात आहेत,” असं ते म्हणाले.

“दिल्लीत एकूण ५८ लाख ग्राहक आहेत. यापैकी ३० लाख लोकांचं बिल शून्य येतं. १७ लाख लोकांना अर्ध बिल येतं. आम्ही त्यांनाच अनुदान देऊ ज्यांना ते हवं आहे. ही सुविधा १ ऑक्टोबरपासून लागू होईल,” असं त्यांनी स्पष्ट केलं.

भरावा लागेल फॉर्म
वीजेच्या बिलासोबत एक फॉर्म देण्यात येणार आहे. तो फॉर्म ग्राहकांना वीज बिल भरणा केंद्रात द्यावा लागेल. तसंच 7011311111 हा नंबर दारी करण्यात आला आहे. यावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. त्यानंतर यावर एक लिंक येईल. यानंतर व्हॉट्सअॅपवर फॉर्म ओपन होईल. ज्यांना मोबाईल क्रमांक रजिस्टर आहे त्यांना मेसेज पाठवला जाणार आहे. ३१ ऑक्टोबर पर्यंत जितके लोक हा फॉर्म भरतील त्यांना या योजनेचा लाभ मिळेल. पुढील महिन्यात फॉर्म भरल्यानंतर मागील महिन्याचं बिल जमा करावं लागेल. सरकार घरोघरी जाऊनही मोहीम सुरू करणार असल्याचं त्यांनी नमूद केलं.

Web Title: elhi cm arvind kejriwal electricity subsidy in delhi need to fill form know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.