AI'च्या मदतीने अखनूरमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा; लष्कराने यशस्वी ऑपरेशननंतर खुलासा केला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 08:48 PM2024-10-29T20:48:29+5:302024-10-29T20:49:19+5:30

लष्कराने अखनूर ऑपरेशनमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी एआयचा वापर केला, असल्याची माहिती दिली.

Eliminate terrorists in Akhnoor with the help of AI army disclosed after the successful operation | AI'च्या मदतीने अखनूरमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा; लष्कराने यशस्वी ऑपरेशननंतर खुलासा केला

AI'च्या मदतीने अखनूरमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा; लष्कराने यशस्वी ऑपरेशननंतर खुलासा केला

सोमवारी जम्मू-काश्मीरच्या अखनूर सेक्टरमध्ये लष्कराच्या ताफ्यावर ॲम्ब्युलन्सवर गोळीबार करणाऱ्या तीन दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी ठार केले. याबाबत  लष्कराने मोठा खुलासा केला. अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अशी, अखनूर ऑपरेशनमध्ये त्यांच्या टीमने दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी AI चा वापर केला. एआयच्या मदतीने आम्हाला दहशतवाद्यांविरुद्धच्या कारवाईत जलद आणि यशस्वी परिणाम मिळाले. 

दहशतवादविरोधी कारवाईदरम्यान लष्कराने चार वर्षांचा स्निफर डॉग फँटम गमावला. शोध मोहिमेदरम्यान तो टीमचे नेतृत्व करत होता, यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार केला, यात त्याचा मृत्यू झाला. लष्कराच्या श्वानाच्या बलिदानामुळे लष्कराच्या अनेक जवानांचे प्राण वाचू शकले.

हरयाणा निवडणुकीबाबत काँग्रेसचे आरोप फेटाळले, निवडणूक आयोगाने १६०० पानांचं दिलं उत्तर

भारतीय लष्कराचे मेजर समीर श्रीवास्तव यांनी दिलेली माहिती अशी, जम्मू आणि काश्मीरमधील अखनूरमध्ये दहशतवादविरोधी कारवायांमध्ये लष्कराने मानवरहित वाहने आणि एआयचा वापर केला. याद्वारे आपण जलद आणि यशस्वी परिणाम मिळवू शकतो. या ऑपरेशननंतर अशी माहिती पसरली की लष्कराने दहशतवाद्यांविरोधात बीएमपी टँकचा वापर केला होता, होय आम्ही ते वापरले, कारण हा परिसर खूप अवघड होता .

 जीओसी १० इन्फंट्री डिव्हिजनचे मेजर समीर श्रीवास्तव म्हणाले, दहशतवादविरोधी मोहिमेदरम्यान, आम्ही शोध मोहीम राबवत होतो, तेव्हा सैन्याचा कुत्रा फँटम सर्वात पुढे धावत होता. दहशतवाद्यांनी कुत्र्यावर गोळीबार केला. त्यांच्या बलिदानामुळेच आपल्या अनेक लोकांचे प्राण वाचू शकले. दहशतवाद्यांच्या हल्ल्यापासून सैनिकांना वाचवण्याचा प्रयत्न करत असताना फँटमला गोळी लागली.

मेजर जनरल श्रीवास्तव यांनी  सांगितले की, "जेव्हा आम्हाला आमच्या सूत्रांकडून गावात दहशतवादी आल्याची माहिती मिळाली तेव्हा आम्ही तात्काळ कारवाई करण्याचा निर्णय घेतला. दहशतवादी सशस्त्र होते, आम्हाला वाटले की दहशतवादी संघटना काहीतरी मोठे करण्याचा विचार करत आहेत असल्याचा आम्हाला संशय आला.

Web Title: Eliminate terrorists in Akhnoor with the help of AI army disclosed after the successful operation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.