"सर्वाधिक फॉलो केले जाणारे जागतिक नेते...", इलॉन मस्क यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2024 12:25 AM2024-07-20T00:25:13+5:302024-07-20T00:27:04+5:30

Elon Musk : इलॉन मस्क हे एक्सचे मालक आहेत. तसेच, या प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेले व्यक्ती देखील आहेत.

Elon Musk congratulates PM Modi on becoming most followed world leader on X | "सर्वाधिक फॉलो केले जाणारे जागतिक नेते...", इलॉन मस्क यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन!

"सर्वाधिक फॉलो केले जाणारे जागतिक नेते...", इलॉन मस्क यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन!

अब्जाधीश उद्योगपती आणि इलेक्ट्रिक कार उत्पादक टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन केले आहे. इलॉन मस्क यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचेसोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) १०० दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स असल्याबद्दल अभिनंदन केले आहे. 

इलॉन मस्क हे एक्सचे मालक आहेत. तसेच, या प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेले व्यक्ती देखील आहेत. इलॉन मस्क यांनी एक्सवर लिहिले आहे की,"सर्वाधिक फॉलो केले जाणारे जागतिक नेते बनल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन." दरम्यान, एक्सवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या लोकांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी सातव्या क्रमांकावर आहेत. तर इलॉन मस्क या यादीत शीर्षस्थानी आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर १०० दशलक्ष म्हणजेच १० कोटींहून अधिक फॉलोअर्स झाले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन (३८.१ दशलक्ष फॉलोअर्स), दुबईचे शासक शेख मोहम्मद (११.२ दशलक्ष फॉलोअर्स) आणि पोप फ्रान्सिस (१८.५ दशलक्ष फॉलोअर्स) यांसारख्या जागतिक नेत्यांच्या तुलनेत पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप पुढे आहेत. 

भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फॉलोअर्सची संख्या इतर भारतीय राजकारण्यांपेक्षा जास्त आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे २६.४ दशलक्ष फॉलोअर्स आहेत तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे २७.५ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. तर समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांचे १९.९ दशलक्ष फॉलोअर्स, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे ७.४ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. 

नरेंद्र मोदींनी सेलिब्रिटींनाही टाकले मागे 
टेलर स्विफ्ट - ९५.३ दशलक्ष
लेडी गागा - ८३.१ दशलक्ष
किम कार्दशियन -७५.२ दशलक्ष
विराट कोहली – ६४.१ दशलक्ष
नेमार जूनियर – ६३.६ दशलक्ष
लेब्रॉन जेम्स – ५२.९ दशलक्ष

Web Title: Elon Musk congratulates PM Modi on becoming most followed world leader on X

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.