"आता माझ्या कंपन्या भारतात..."! पंतप्रधान मोदींना शुभेच्छा देत काय म्हणाले इलॉन मस्क?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2024 08:56 AM2024-06-08T08:56:59+5:302024-06-08T08:57:42+5:30

"पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या वर्षी जून महिन्यात अमेरिका दौऱ्यावर होते. तेथे इलॉन मस्क यांनी त्यांची भेट घेतली होती. तेव्हा, आपण मोदींचे चाहते आहोत, असे म्हणत, टेस्ला भारतात गुंतवणूक करणार असल्याचे मस्क यांनी म्हटले होते."

elon musk congratulates pm Narendra Modi says Looking forward to my companies doing exciting work in India | "आता माझ्या कंपन्या भारतात..."! पंतप्रधान मोदींना शुभेच्छा देत काय म्हणाले इलॉन मस्क?

"आता माझ्या कंपन्या भारतात..."! पंतप्रधान मोदींना शुभेच्छा देत काय म्हणाले इलॉन मस्क?

प्रसिद्ध इलेक्ट्रिक कार उत्पादक टेस्ला कंपनीचे सीईओ तथा दिग्गज उद्योगपती इलॉन मस्क (Elon Musk) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लोकसभा निवडणुकीतील विजयाबद्दल अभिनंदन केले. तसेच, आपल्या कंपन्या भारतात काम करण्यास उत्सुक असल्याचे मस्क यांनी म्हटले आहे.

"नरेंद्र मोदी, जगातील सर्वात मोठ्या लोकशाही निवडणुकीत आपल्या विजयाबद्दल अभिनंदन. माझ्या कंपन्या भारतात काम करण्यास उत्सुक आहेत," असे मस्क यांनी सोशल मीडिया पोस्ट करत म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे, निवडणुकीपूर्वी, मस्क यांनी भारत दौऱ्यावर येण्याचे ठरवले होते. मात्र, नतंर त्यांनी हा दौरा रद्द केला होता.

तत्पूर्वी, शुक्रवारी नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवन येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेत सरकार स्थापनेचा दावा केला. यावेळी, राष्ट्रपती मुर्मू यांनी त्यांना पंतप्रधानपदासाठी नामनिर्देशित केले. नरेंद्र मोदी रविवारी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील. भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीएने लोकसभेच्या 543 पैकी 293 जागा जिंकल्या आहेत.

इलॉन मस्क यांनी गेल्यावर्षी अमेरिकेत घेतली होती मोदी भेट - 
पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या वर्षी जून महिन्यात अमेरिका दौऱ्यावर होते. तेथे इलॉन मस्क यांनी त्यांची भेट घेतली होती. तेव्हा, आपण मोदींचे चाहते आहोत, असे म्हणत, टेस्ला भारतात गुंतवणूक करणार असल्याचे मस्क यांनी म्हटले होते. याशिवाय, आपण 24,000 डॉलर किंमतीच्या ईव्हीचे उत्पान करण्यासाठी भारतात कारखाना सुरू करण्यास उत्सुक आहोत, असे टेस्लाने गेल्या वर्षी जुलै महिन्यात म्हटले होते.

Web Title: elon musk congratulates pm Narendra Modi says Looking forward to my companies doing exciting work in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.