'आपल्या मृत्यूनंतर मी सांभाळू शकतो Twitter?' मस्क यांनी दिलं दिलदार उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 05:19 PM2022-05-12T17:19:50+5:302022-05-12T17:21:44+5:30
टेस्लाचे CEO आणि SpaceX चे फाउंडर इलॉन मस्क, हे गेल्या काही दिवसांपासून आपल्या ट्विट्समुळे सातत्याने चर्चेत असतात.
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांनी 'आपल्या मृत्यूनंतर' ट्विटरच्या उत्तराधिकाऱ्यासंदर्भात एक ट्विट केले आहे. त्यांच्या या ट्विटची जबरदस्त चर्चा सुरू आहे. मात्र, त्यांचे हे ट्विट विनोदी असल्याचे बोलले जात आहे.
टेस्लाचे CEO आणि SpaceX चे फाउंडर इलॉन मस्क, हे गेल्या काही दिवसांपासून आपल्या ट्विट्समुळे सातत्याने चर्चेत असतात. यातच त्यांनी आपल्या मृत्यूसंदर्भात ट्विट केले आहे. यात त्यांनी, 'जर संशयास्पद परिस्थितीत माझा मृत्यू झाला, तर हे nice knowin ya असेल,' असे लिहिले होते. या ट्विटकडे त्यांच्या पुढील ट्विटला जोडून पाहिले जात आहे. यात त्यांनी रशियाच्या धमकीसंदर्भात भाष्य केले होते.
मस्क यांच्या मृत्यूसंदर्भातील या ट्विटवर यूट्यूब स्टार जिम्मी डोनाल्डसन (मिस्टर बीस्ट)ने रिप्लाई करत, जर असे झाल्यास, मी ट्विटर संभाळू शकतो? याला उत्तर देत मस्क यांनी ‘ओके’ असे लिहिले आहे.
मस्क यांच्या या घोषणेकडे विनोद म्हणून पाहिले जात आहे. मस्क यांनी 'ओके' म्हटल्यानंतर, डोनाल्डसन यांनी रिप्लाय दिला आहे. "विनोदाचा भाग सोडा, आपण सुरक्षित रहा! I wuv u, असे डोनाल्डसन यांनी म्हटले आहे.