वरात निघण्याआधी फरार झालेला नवरदेव प्रेयसीसोबत परतला, लहान भावाने केलं होणाऱ्या वहिनीसोबत लग्न
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2023 09:52 AM2023-02-09T09:52:02+5:302023-02-09T09:53:49+5:30
वरात निघण्याच्या काही तासांआधी खोटं बोलू फरार झाल्यावर समाज आणि नातेवाईकांसमोर नामुष्की झाली होती. जर लहान मुलगाही लग्नासाठी तयार झाला नसता तर दोन्ही परिवारांसाठी स्थिती गंभीर झाली असती.
उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) लग्नाच्या दिवशी फेशिअल करायला जात असल्याचं कारण देत फरार झालेला नवरदेव 10 दिवसांनंतर आपल्या प्रेयसीसोबत कोर्ट मॅरेज करून घरी परतला. पण कुटुंबियांनी त्याला घरात येऊ दिलं नाही. त्याचे वडील म्हणाले की, आता त्यांचा त्यांच्या मुलासोबत काही संबंध नाही. तो वयस्क आणि त्याला जिथे ज्याच्यासोबत रहायचं आहे राहू शकतो. वरात निघण्याच्या काही तासांआधी खोटं बोलू फरार झाल्यावर समाज आणि नातेवाईकांसमोर नामुष्की झाली होती. जर लहान मुलगाही लग्नासाठी तयार झाला नसता तर दोन्ही परिवारांसाठी स्थिती गंभीर झाली असती.
मोहम्मदपूर गावात राहणारे मावत तिवारी यांनी आपला मोठा मुलगा शशांकचं लग्न बरेलीमध्ये ठरवलं होतं. 1 जानेवारीला वरात जाणार होती. वरात निघायच्या ठीक आधी फेशिअल आणि केस कापयला जात असल्याचं कारण देत तो पळून गेला होता. बराच वेळ जेव्हा शशांक परत आला नाही तेव्हा सगळेच घाबरले होते. त्याला खूप शोधण्यात आलं पण त्याचा काही पत्ता लागला नाही.
नंतर नवरीकडील लोकांसोबत बोलून शशांकचा लहान भाऊ विषर्भला नवरदेव बनवून वरात नेण्यात आली. आपल्या होणाऱ्या वहिनीसोबत विषर्भने सात फेरे घेऊन लग्न केलं. यादरम्यान परिवार आणि पोलीस शशांकला सगळीकडे शोधत होते. शशांकला शोधण्यासाठी पोलिसांनी सर्विलांसची मदत घेतली.
तेच याबाबत पोलीस अधिकारी अचल कुमार यांनी सांगितलं की, बेपत्ता नवरदेवाच्या नंबरच्या सीडीआरमध्ये एका तरूणीचा नंबर सापडला. नंतर त्या तरूणीला पोलीस स्टेशनमध्ये बोलवण्यात आलं. तिची चौकशी केली तेव्हा तिने आधी काहीच सांगितलं नाही.
जेव्हा कठोरपणे विचारण्यात आलं तेव्हा तिने सांगितलं की, तिने शशांकसोबत कोर्टात लग्न केलं. नंतर तिने लग्नाचं प्रमाणपत्रही दाखवलं. यानंतर शशंकच्या कुटुंबियांना बोलवण्यात आलं. शशांकडे वडील म्हणाले की, त्यांनी त्यांच्या मोठ्या मुलासोबत नातं तोडलं आहे. ते वयस्क आहेत त्यांच्या मनाने कुठेही राहू शकतात.