चौकशीत एल्विशने घेतले या बॉलिवूड सिंगरचे नाव, त्याचीही चौकशी होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2023 07:54 PM2023-11-09T19:54:40+5:302023-11-09T19:55:26+5:30

एल्विश यादववर रेव्ह पार्ट्यांमध्ये सापाचे विष पुरवल्याच्या आरोप आहे.

Elvish Yadav Case: Elvish took the name of Bollywood singer fazilpuria in the investigation, he will also be investigated | चौकशीत एल्विशने घेतले या बॉलिवूड सिंगरचे नाव, त्याचीही चौकशी होणार

चौकशीत एल्विशने घेतले या बॉलिवूड सिंगरचे नाव, त्याचीही चौकशी होणार

Elvish Yadav Case: बिग बॉस ओटीटी-2 विजेता आणि प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादववर रेव्ह पार्ट्यांमध्ये सापाचे विष पुरवल्याच्या आरोप आहे. भाजप नेत्या मनेका गांधी यांनी एल्विशवर गंभीर आरोप केले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी मंगळवार आणि बुधवारी तीन तास एल्विशची कसुन चौकशी केली. यादरम्यान, त्याने सिंगर फाजिलपुरियाचे नाव घेतले आहे. 

फजिलपुरियाने एल्विशला बोलावले होते?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, फाजिलपुरियाने सापासोबत शूट केलेला व्हिडिओ गुरुग्राममधील आहे. तिथे एल्विशला फाजिलपुरियानेच बोलावले. त्यानेच साप मागवले होते. आता पोलीस फाजिलपुरियाचीही चौकशी करू शकतात, असे मानले जात आहे. दरम्यान, तीन तासांच्या चौकशीनंतर पोलिसांनी एल्विशला सोडले असून, पुढील तपासात सहकार्य करण्यास सांगितले आहे. 

कोण आहे फाजिलपुरिया?
फाजिलपुरिया सिंगर-रॅपर आहे. आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांच्या 'कपूर अँड सन्स' चित्रपटातील एक गाणे '...लडकी ब्युटीफुल कर गई चुल', हे गाणे सिनेमा रिलीज होण्याच्या तीन वर्षे आधी अल्बम स्वरुपात रिलीज झाले होते. त्यावेळी या गाण्याची किंवा त्याच्या गायकाची फार चर्चा झाली नाही, पण हे गाणे नेटीझन्समध्ये लोकप्रिय झाले. हे गाणे राजस्थान-हरियाणा सीमेजवळ असलेल्या फाजिलपूर झारसा या गावातील राहुल यादवने गायले आहे. आपले गाव प्रसिद्ध व्हावे म्हणून त्यांनी आपले नाव राहुलवरून बदलून फाजिलपुरिया केले आहे. तेव्हापासून लोक त्याला फाजिलपुरिया या नावाने ओळखतात.

Web Title: Elvish Yadav Case: Elvish took the name of Bollywood singer fazilpuria in the investigation, he will also be investigated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.