सापाच्या विषप्रकरणी एल्विश यादवची चौकशी, सोबत होता ७ वकिलांचा फौजफाटा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2023 12:27 PM2023-11-09T12:27:44+5:302023-11-09T12:28:23+5:30
वन्यजीव (संरक्षण) कायदा, १९७२च्या तरतुदींनुसार गेल्या आठवड्यात येथे दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये यादव याचा समावेश आहे.
नोएडा : यू ट्यूबर आणि ‘बिग बॉस ओटीटी-२’ विजेता एल्विश यादवची मंगळवारी रात्री रेव्ह पार्टीत सापाच्या विषाचा संशयास्पद वापर केल्याबद्दल नोएडा पोलिसांनी सुमारे तीन तास चौकशी केली. त्याच्यासोबत ७ वकिलांचा फौजफाटा होता.
वन्यजीव (संरक्षण) कायदा, १९७२च्या तरतुदींनुसार गेल्या आठवड्यात येथे दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये यादव याचा समावेश आहे.
आठ सापांचे दात गायब
तपास समितीचे प्रमुख डॉ. निखिल वार्ष्णेय यांनी सांगितले की, पशुवैद्यकीय विभागाला त्यांच्या तपासणीत ३ नोव्हेंबर रोजी आरोपींच्या ताब्यातून सुटका केलेल्या पाच कोब्रांसह सर्व नऊ सापांमध्ये विष ग्रंथी गायब असल्याचे आढळले. तसेच सुटका करण्यात आलेल्या नऊपैकी आठ सापांचे दात गायब होते. हा अहवाल कोर्टात सादर करण्यात येणार आहे. नऊ साप कोर्टाच्या परवानगीने जंगलात सोडण्यात आले आहेत.