ई-मेल, एसएमएसवर पीएफची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 01:04 AM2018-04-27T01:04:30+5:302018-04-27T01:04:30+5:30
पीएफओच्या या सुविधेतून कर्मचाºयांना त्यांच्या पीएफ खात्यातील रकमेची माहिती एसएमएस वा मिस्ड कॉलवर मिळू शकेल.
नवी दिल्ली : कंपनीने वेतनातून कापलेली भविष्य निर्वाह निधी (पीएफ)ची रक्कम पीएफ खात्यात जमा केली नाही, तर त्याची माहिती आता एसएमएस व ईमेलवर मिळणार आहे. कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (ईपीएफओ) ही माहिती एसएमएस/ई-मेलद्वारे देण्याचे ठरवले आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनातून पीएफची रक्कम कापून ती प्रत्यक्षात खात्यात जमा न करणाºयांना कंपन्या व मालकांना चाप बसणार आहे.
या सोयीसाठी कर्मचाºयाचा मोबाइल नंबर व इमेल आयडी त्याच्या युनिव्हर्सल अकाऊंट नंबर (यूएएन) शी लिंक असणे आवश्यक आहे. कामगार मंत्रालयाने म्हटले आहे की, ईपीएफओच्या या सुविधेतून कर्मचाºयांना त्यांच्या पीएफ खात्यातील रकमेची माहिती एसएमएस वा मिस्ड कॉलवर मिळू शकेल. शिवाय सदस्य ई-पासबुकही पाहू शकतील. अनेक कंपन्या कर्मचाºयांच्या पीएफची रक्कम वेळेत वा अजिबातच जमा करीत नाहीत. अशा अनेक तक्रारी आहेत. अशा कंपन्यांना नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत.