छळामुळे कर्मचार्याला नैराश्याचा झटका मनपा : एका कर्मचार्याची बदली
By admin | Published: December 1, 2015 11:36 PM2015-12-01T23:36:02+5:302015-12-01T23:36:02+5:30
जळगाव : मनपातील एका कर्मचार्याला डावलून दुसर्याला पुढे केल्याने तसेच मनपातीलच काही अधिकारी, कर्मचार्यांनी छळ केल्यामुळे एका कर्मचार्याला नैराश्याचा झटका आल्याने रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. दरम्यान या प्रकरणी एका वाहनचालकाची तातडीने दवाखाने विभागात बदली करण्यात आली आहे.
Next
ज गाव : मनपातील एका कर्मचार्याला डावलून दुसर्याला पुढे केल्याने तसेच मनपातीलच काही अधिकारी, कर्मचार्यांनी छळ केल्यामुळे एका कर्मचार्याला नैराश्याचा झटका आल्याने रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. दरम्यान या प्रकरणी एका वाहनचालकाची तातडीने दवाखाने विभागात बदली करण्यात आली आहे. मनपातील एक कर्मचारी उपायुक्तांनी अन्य कर्मचार्यावर विशेष मेहेरबानी केल्याने डावलला गेल्याने नाराज होता. त्यातच काही अधिकारी, कर्मचार्यांकडून त्याची टिंगल टवाळी केली गेल्याने त्यास नैराश्याचा झटका आल्याचे समजते. सोमवारी मनपातील एका कार्यक्रमानंतर या कर्मचार्याने आयुक्तांसमोर रडून आपले मन मोकळे केले. मात्र त्याचवेळी त्याला भोवळ आल्याने तातडीने खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान याप्रकरणी आयुक्तांनी तातडीने वाहनविभागातील प्रभारी डिझेल मेकॅनिक संजय बागुल (मूळ पद वाहनचालक) यांची दवाखाने विभागात शववाहिकेचा चालक म्हणून बदली केली आहे. ------जागृत जनमंचचा आरोपमनपा प्रशासनानेही संबंधीत कर्मचार्याचा मानसिक छळ केला. उपायुक्त गांगोडे व आयुक्तांनी फूस दिल्यानेच दुसर्या कर्मचार्याला पुढे केले गेले. दरम्यान उपायुक्त जगताप यांनी तर या कर्मचार्याला रजेवर जाण्याचे फर्मान काढले होते. मात्र नंतर या प्रकरणाचा भंडाफोड झाल्याने तातडीने संजय बागुल यांना पदावनतीचे आदेश दिल्याचा आरोप जळगाव जागृत जनमंचचे शिवराम पाटील, कॉ.अनिल नाटेकर यांनी केला आहे.