कचरा वर्गीकरणास कर्मचा-यांचा नकार भवानीपेठ , घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयात कच-याची समस्या गंभीर

By admin | Published: February 18, 2015 12:13 AM2015-02-18T00:13:29+5:302015-02-18T00:13:29+5:30

पुणे : महापालिकेने नागरीकांकडून कचरावर्गीकरण करून घेणे आवश्यक असताना, पालिकेकडून कर्मचा-यांना वर्गीकरण करणे बंधनकारक करणे चुकीचे आहे. त्यामुळे केवळ कचरा संकलन करण्याची भूमिका घेत भवानीपेठ आणि घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाकडील सुमारे500 कर्मचा-यांनी कचरावर्गीकरणास नकार दिला आहे. त्यामुळे या क्षेत्रीय कार्यालयांच्या परिसरात मोठया प्रमाणात कचरा वर्गीकरण्अअची समस्या निर्माण झाली असून या कामासाठी ठेकेदारांच्या कर्मचा-यांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सुरेश जगताप यांनी दिली. तसेच याबाबत महापालिका युनियनच्या प्रतिनिधींशी चर्चा सुरू असून लवकरच तोडगा काढला जाणार असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले.

Embarrassment for the garbage classification: Bhavanipeeth, Ghole road: Problem of garbage in regional office | कचरा वर्गीकरणास कर्मचा-यांचा नकार भवानीपेठ , घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयात कच-याची समस्या गंभीर

कचरा वर्गीकरणास कर्मचा-यांचा नकार भवानीपेठ , घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयात कच-याची समस्या गंभीर

Next
णे : महापालिकेने नागरीकांकडून कचरावर्गीकरण करून घेणे आवश्यक असताना, पालिकेकडून कर्मचा-यांना वर्गीकरण करणे बंधनकारक करणे चुकीचे आहे. त्यामुळे केवळ कचरा संकलन करण्याची भूमिका घेत भवानीपेठ आणि घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाकडील सुमारे500 कर्मचा-यांनी कचरावर्गीकरणास नकार दिला आहे. त्यामुळे या क्षेत्रीय कार्यालयांच्या परिसरात मोठया प्रमाणात कचरा वर्गीकरण्अअची समस्या निर्माण झाली असून या कामासाठी ठेकेदारांच्या कर्मचा-यांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सुरेश जगताप यांनी दिली. तसेच याबाबत महापालिका युनियनच्या प्रतिनिधींशी चर्चा सुरू असून लवकरच तोडगा काढला जाणार असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले.
कचरा आंदोलनानंतर महापालिकेने शहरात कचरा वगीकरण सक्तीचे केले आहे. मात्र, नागरिकांकडून ते केले जात नसल्याने ही जबाबदारी प्रशासनाकडून कर्मचा-यांवर सोपविण्यात आली आहे. मात्र, कर्मचा-यांकडे पुरेशी साधन सामुग्री नसल्याने वर्गीकरण करताना या कर्मचा-यांच्या जिवितास तसेच आरोयास धोका निर्माण झाल्याने भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयाकडील सुमारे तीनशें हून अधिक कर्मचा-यांनी वर्गीकरणास नकार दिला असून केवळ संकलन करण्याची भूमिका घेतली आहे. तर घोले-रस्ता क्षेत्रीय कार्यालयाकडीलही 60 ते 70 कर्मचा-यांनी ही भूमिका घेतली आहे. त्या मुळे या दोन्ही क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत येणा-या 10 ते 12 प्रभागांमध्ये कच-याची समस्या गंभीर बनली असून सर्वत्र कच-याचे ढीग साचल्याचे जगताप म्हणाले. ही समस्या सोडविण्यासाठी तूर्तास ठेकेदाराकडील कर्मचारी रोजंदारीवर नेमण्यात आले असून त्यांच्याकडून वर्गीकरण करून घेतले जात असल्याचे जगताप म्हणाले.
==================
कचरावर्गीकरण निर्मितीच्या ठिकाणी होणे कायद्यानेच बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार, महापालिकेने उपाय योजना करून याची जनजागृती करणे आवश्यक आहे. मात्र, गेल्या दहा वर्षापासून कचराडोळ्याआड करण्या व्यतिरिक्त कोणत्याही उपाय योजना केल्या जात नाहीत आणि कर्मचा-यांना बंधनकारक केले जाते. ही बाब चुकीची आहे. त्यामुळे या वादावर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाशी चर्चा सुरू आहे. त्यात तोडगा न निघाल्यास न्यायालयात जाण्याची कामगार संघटनेची तयारी आहे.- उदय भट ( अध्यक्ष, पुणे मनपा कामगार युनियन )
==================

Web Title: Embarrassment for the garbage classification: Bhavanipeeth, Ghole road: Problem of garbage in regional office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.