प्रभारी अधिकारी व डीबीच्या कर्मचार्यांचे कान उपटले तातडीची बैठक : घरफोडी रोखण्याच्या बैठकीतच आली घरफोडीची बातमी
By admin | Published: October 5, 2016 12:31 AM2016-10-05T00:31:26+5:302016-10-05T00:31:26+5:30
जळगाव: गेल्या दोन दिवसापासून एका पाठोपाठ घरफोड्या होत असल्याने पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी मंगळवारी शहरातील सर्व प्रभारी अधिकारी व गुन्हे शोध पथकाच्या कर्मचार्यांची तातडीची बैठक घेवून त्यांचे कान उपटले. दरम्यान, घरफोड्या रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची माहिती दिली जात असतानाच अक्सा नगरात दहा लाख रुपयांची धाडसी घरफोडी झाल्याची बातमी येऊन धडकली. त्यामुळे बैठक चांगलीच गरमागरम झाली.
Next
ज गाव: गेल्या दोन दिवसापासून एका पाठोपाठ घरफोड्या होत असल्याने पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी मंगळवारी शहरातील सर्व प्रभारी अधिकारी व गुन्हे शोध पथकाच्या कर्मचार्यांची तातडीची बैठक घेवून त्यांचे कान उपटले. दरम्यान, घरफोड्या रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची माहिती दिली जात असतानाच अक्सा नगरात दहा लाख रुपयांची धाडसी घरफोडी झाल्याची बातमी येऊन धडकली. त्यामुळे बैठक चांगलीच गरमागरम झाली.पोलीस अधीक्षक कार्यालयातील प्रेरणा सभागृहात झालेल्या या बैठकीला अपर पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील व उपअधीक्षक सचिन सांगळे उपस्थित होते. शहरात सुरू असलेल्या घरफोडीच्या घटना रोखण्यासाठी गुन्हे शोध पथकाला अपयश येत आहे. या पथकातील कर्मचारी निष्क्रीय झाल्यानेच या घटनांमध्ये वाढ होत आहे. बोटावर मोजण्या इतक्याच कर्मचार्यांची कामगिरी समाधान आहे. त्यामुळे निष्क्रीय ठरलेल्या कर्मचार्यांवर बदलीची कुर्हाड कोसळू शकते, असा इशारा सुपेकर यांनी बैठकीत दिला.चांगले काम करणार्या अधिकारी व कर्मचार्यांना ज्या पध्दतीने रिवॉर्ड दिला जातो, त्याच पध्दतीने निष्क्रीय काम करणार्यांची नोंद सेवा पुस्तकात घेतली जाणार आहे. घरफोडी व चोरीच्या घटना रोखण्यासाठी आपआपल्या हद्दीत प्रामाणिकपणे गस्त घातली तरी या गुन्ांना आळा बसेल, परंतु कर्मचार्यांची गस्त कागदोपत्रीच असल्याचे दिसून येत आहे. अचानक नाकाबंदी, कोम्बींग ऑपरेशन, रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करण्याच्या सूचना सुपेकर यांनी दिल्या. गस्ती व अन्य कामात पोलीस मित्रांची मदत घ्यावी असेही त्यांनी सुचविले. दरम्यान, या बैठकीनंतर उपअधीक्षक सचिन सांगळे यांनीही प्रभारी अधिकार्यांची बैठक घेतली.