कार्यकारी अभियंत्यावर खुर्ची जप्तीची नामुष्की

By admin | Published: April 26, 2016 11:11 PM2016-04-26T23:11:58+5:302016-04-27T00:09:28+5:30

सीईओंनी झटकले अंग : पाझरतलाव, साठवण बंधारा भूसंपादन प्रकरण

Emergency of the seizure of chair on executive engineer | कार्यकारी अभियंत्यावर खुर्ची जप्तीची नामुष्की

कार्यकारी अभियंत्यावर खुर्ची जप्तीची नामुष्की

Next

सीईओंनी झटकले अंग : पाझरतलाव, साठवण बंधारा भूसंपादन प्रकरण
नाशिक : मालेगावच्या भूसंपादन प्रकरणात काही दिवसांपूर्वीच नाशिकचे जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्यावर खुर्ची जप्तीची वेळ आलेली असतानाच, मंगळवारी (दि. २६) जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंत्यावर मालेगाव व दिंडोरी येथील शेतकर्‍यांच्या भूसंपादनाचा वाढीव मोबदला देण्याच्या कारणावरून न्यायालयाच्या आदेशानुसार खुर्चीसह संगणक, टेबल जप्तीची वेळ आली.
मंगळवारी दुपारीच हातनोरे (दिंडोरी) येथील पाझरतलावासाठी माधव कुशबा बोरस्ते यांच्या जमिनीचे भूसंपादन करण्यात आले होते. त्यासाठी संबंधित शेतकरी माधव बोरस्ते यांनी २७ लाख ६ हजारांचा वाढीव मोबदला २००१ साली मागितला होता. त्याप्रकरणी संबंधित शेतकर्‍याने जिल्हा सत्र न्यायालयात याप्रकरणी याचिका दाखल केली होती. २०१० साली शेतकर्‍याच्या बाजूने निकाल लागून शेतकर्‍याला वाढीव मोबदला देण्याचे आदेश न्यायालयाने जिल्हा परिषदेला दिले होते. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाने यासंदर्भात जानेवारी २०१६ मध्ये ग्रामविकास विभागाच्या प्रधानसचिवांना वाढीव मोबदला देण्याचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतरही जिल्हा परिषदेने या शेतकर्‍याला भूसंपादनाचा वाढीव मोबदला न दिल्याने न्यायालयाच्या आदेशाने जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता चंद्रशेखर वाघमारे यांची खुर्ची, संबंधित लिपिक शेवाळे यांची खुर्ची व संगणक तसेच चार टेबल या शेतकर्‍याने जमा करून न्यायालयात जमा केले. अशाच वाढीव मोबदल्याच्या प्रकरणात मालेगाव तालुक्यातील डोंगरेज येथील शेतकरी त्र्यंबक रामचंद्र खैरनार यांनी १४ लाखांच्या वाढीव मोबदल्यासाठी खुर्ची जप्तीसाठी धाव घेतली. मात्र त्यांना तूर्तास थांबण्यास सांगण्यात आल्याचे कळते. खुर्ची जप्तीच्या कारवाईने दिवसभर जिल्हा परिषदेत याच प्रकरणाची चर्चा होती. (प्रतिनिधी)
इन्फो..
अंग झटकले
खुर्ची जप्तीची कारवाई सुरू असतानाच कार्यकारी अभियंता चंद्रशेखर वाघमारे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याशी संपर्क साधला. त्यांना या कारवाईची कल्पना दिली. मात्र शंभरकर यांनी याप्रकरणी संबंधित विभागास दिलासा देण्याऐवजी असेच प्रकरण इगतपुरीत कावनई येथे असून, त्याप्रकरणी नियोजन करू, असे सांगत वेळ मारून नेल्याचे समजते. वास्तविक पाहता या प्रकरणात मिलिंद शंभरकर यांनी शिष्टाई करून ही खुर्ची जप्तीची बदनामी टाळणे शक्य असल्याची चर्चा जिल्हा परिषदेत होती.
फोटो कॅप्शन-
२६ पीएचअेपी- ७६ कार्यकारी अभियंत्याची खुर्ची, संगणक जप्त करताना शेतकरी.
२६ पीएचअेपी-७७ कार्यकारी अभियंत्याची खुर्ची जप्त करताना संबंधित शेतकरी. (छाया : नीलेश तांबे)

Web Title: Emergency of the seizure of chair on executive engineer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.