आता ५ दिवसात शरीरातील कोरोना विषाणू नष्ट करणारं औषध आलं!, कंपनीनं DCGI कडे मागितली परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2021 02:38 PM2021-07-09T14:38:43+5:302021-07-09T14:41:37+5:30
हेटरो (Hetero) कंपनीनं कोरोना विषाणूवरील प्रभावी औषध ठरणाऱ्या मोलनुपिराविर (Molnupiravir) औषधाच्या आपत्कालीन वापराची परवानगी ड्रग्ज कंट्रोलर ऑफ इंडियाकडे (DCGI) मागितली आहे.
हेटरो (Hetero) कंपनीनं कोरोना विषाणूवरील प्रभावी औषध ठरणाऱ्या मोलनुपिराविर (Molnupiravir) औषधाच्या आपत्कालीन वापराची परवानगी ड्रग्ज कंट्रोलर ऑफ इंडियाकडे (DCGI) मागितली आहे. मोलनुपिराविर टॅबलेट कोरोनाची सौम्य लक्षणं असणाऱ्या रुग्णांसाठी वरदान ठरणार आहे. हेटरो कंपनीनं केलेल्या वैद्यकीय चाचणीत रुग्णाच्या शरीरातून कोरोना विषाणूचा पाच दिवसांत नायनाट करण्याची क्षमता या औषधात असल्याचा दावा करण्यात आला आहे. (Emergency use Permission sought from DCGI for corona drug Molnupiravir company claims virus can be eliminated from the body in 5 days)
जगात कोरोना मृत्यूंचा आकडा ४० लाखांवर, १८ कोटींहून अधिक रुग्ण; बरे झाले १७ कोटी
तिसऱ्या टप्प्यातील अंतरिम चाचणीत १२१८ रुग्णांवर या औषधाची चाचणी करण्याची परवानगी मागण्यात आली आहे. merck आणि Ridgeback Biotherapeutics LP कंपनीनं या औषधाची निर्मिती केली आहे. जे रुग्ण रुग्णालयात दाखल नाहीत आणि राहत्या घरीच उपचार घेत आहेत, अशा रुग्णांसाठी हे औषध अतिशय उपयुक्त ठरणार आहे. औषधाची अंतिम चाचणी ७१४ रुग्णांवर करण्यात आली होती.
५ दिवसात शरीरातून कोरोना विषाणूचा नायनाट
औषध निर्माती कंपनी मर्कनं कोविड-१९ विषाणूवर प्रभावी ठरणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनशी मिळतंजुळतं औषध असणाऱ्या मोलनुपिराविरच्या उत्पादनासाठी भारतात पाच जेनेरिक औषध निर्मात्या कंपन्यांसोबत करार करण्याची घोषणा करण्यात आली होती. या औषधावर करण्यात आलेल्या अभ्यासादरम्यान चांगले परिणमा समोर आले आहेत. यात कोरोना संक्रमित झालेल्या रुग्णानं या औषधाचं सेवन केल्यांतर शरीरातील विषाणूंच्या प्रमाणात सातत्यानं घट होत असल्याचं दिसून आलं होतं.
देशात कोरोनाची स्थिती काय?
देशातील कोरोनाची सद्यस्थिती पाहता केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं शुक्रवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांत देशात ४३ हजार ३९३ नवे रुग्ण आढळले आहेत. तर ९११ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात ४ लाख ५८ हजार ७२७ सक्रीय रुग्ण आहेत.