प्रख्यात घटनातज्ज्ञ फली नरिमन कालवश; वकील म्हणून ७० वर्षे बजावली सेवा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 05:18 AM2024-02-22T05:18:15+5:302024-02-22T05:18:24+5:30
१० जानेवारी १९२९ रोजी फली नरिमन यांचा जन्म म्यानमारमध्ये झाला. त्यांनी वकिलीची सुरुवात नोव्हेंबर १९५० पासून मुंबई उच्च न्यायालयातून केली. सुमारे ७० वर्षे विविध न्यायालयात त्यांनी वकील म्हणून सेवा बजावली.
नवी दिल्ली : प्रख्यात घटनातज्ज्ञ व नामवंत वकील फली नरिमन (९५) यांचे बुधवारी निधन झाले. अनेक दिवसांपासून ते हृदयविकार व अन्य आजारांनी ग्रस्त होते. कायदाक्षेत्रातील भीष्म पितामह असेही त्यांना संबोधण्यात येत असे. फली नरिमन यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व अन्य मान्यवरांनी तीव्र शोक व्यक्त केला.
१० जानेवारी १९२९ रोजी फली नरिमन यांचा जन्म म्यानमारमध्ये झाला. त्यांनी वकिलीची सुरुवात नोव्हेंबर १९५० पासून मुंबई उच्च न्यायालयातून केली. सुमारे ७० वर्षे विविध न्यायालयात त्यांनी वकील म्हणून सेवा बजावली. देशात आणीबाणी लागू झाल्यावर दुसऱ्या दिवशी त्यांनी अतिरिक्त साॅलिसिटरपदाचा राजीनामा दिला.