Vikram Kirloskar: प्रख्यात उद्योगपती विक्रम किर्लोस्कर यांचं निधन, बंगळुरूत घेतला अखेरचा श्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 10:10 AM2022-11-30T10:10:47+5:302022-11-30T10:11:45+5:30
Vikram Kirloskar: प्रख्यात उद्योगपती आणि टोयोटा किर्लोस्कर मोटर्सचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांचं निधन झालं आहे. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर किर्लोस्कर यांनी बंगळुरूमध्ये अखेरचा श्वास घेतला.
बंगळुरू - प्रख्यात उद्योगपती आणि टोयोटा किर्लोस्कर मोटर्सचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांचं निधन झालं आहे. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर किर्लोस्कर यांनी बंगळुरूमध्ये अखेरचा श्वास घेतला. टोयोटा इंडिया कंपनीने ट्विक करून त्यांच्या निधनाची बातमी जाहीर केली. या ट्विटनुसार २९ नोव्हेंबर रोजी हृदयविकाराचा झटका आल्याने विक्रम किर्लोस्कर यांचं निधन झालं. आज दुपारी १ वाजता बंगळुरूतील हेब्बल स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
त्यासोबतच कंपनीने आवाहन केले की, या दु:खद प्रसंगामध्ये त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी, यासाठी प्रार्थना करा, असं आवाहन आम्ही सर्वांना करतो. विक्रम किर्लोस्कर यांचे कुटुंबीय आणि मित्रमंडळी यांच्याप्रति आम्ही संवेदना व्यक्त करतो.
विक्रम किर्लोस्कर यांनी त्यांच्या मागे पत्नी गीतांजली, मुलगी मानसी किर्लोस्कर अशा परिवार सोडला आहे. विक्रम किर्लोस्कर हे किर्लोस्कर उद्योग समुहातील चौथ्या पिढीमधील होते. ते किर्लोस्कर सिस्टमचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टरसुद्धा होते. विक्रम यांनी मेसाचुसेट्स इंन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीमधून मेकॉनिकल इंजिनियरिंगमध्ये ग्रॅज्युएशन केलं होतं. त्याबरोबरच ती अनेक वर्षांपर्यंत सीआयआय, सीएम आणि एआरएआयमध्ये अनेक मोठ्या पदांवर राहिले होते.