कर्मचारी बनली सेलिब्रिटी; ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या महिलेच्या फोटोंना दाद
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 05:21 AM2019-05-15T05:21:21+5:302019-05-15T05:21:39+5:30
येथील मतदान केंद्रावर ईव्हीएम घेऊन जाणा-या व पिवळ्या रंगाची साडीतील महिलेचे छायाचित्र सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाले आहे.
लखनौ : येथील मतदान केंद्रावर ईव्हीएम घेऊन जाणा-या व पिवळ्या रंगाची साडीतील महिलेचे छायाचित्र सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाले आहे. रिना द्विवेदी असे महिलेचे नाव असून, त्या सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये कनिष्ठ सहायक आहेत. लोकसभा निवडणुकांच्या काळात सेलिब्रिटी बनल्याने त्यांना खूपच आनंद झाला आहे.
व्हॉट्सअप, टीकटॉकवर रिना द्विवेदी यांची छायाचित्रे व्हायरल झाली आहेत. त्या म्हणाल्या की माझा विवाह लवकर झाला. पण मी करिअरकडेही नीट लक्ष दिले. लोकांना माझी छायाचित्र आवडल्याचा मला आनंद आहे. आपली दखल घ्यावी असे प्रत्येकाला वाटते.
रिना द्विवेदी ज्या मतदान केंद्रावर होत्या, तिथे १०० टक्के मतदान झाले, अशी गंमतीदार प्रतिक्रियाही सोशल मीडियात प्रकटली. त्यांची छायाचित्रे, व्हिडीओ इंटरनेटवर आकर्षणाचा विषय झाले आहेत.
त्यांनी २०१४ सालच्या लोकसभेच्या व २०१७ सालच्या विधानसभेच्या निवडणुकीत लखनऊ मतदानकेंद्रावर काम केले होते. मतदानकेंद्रावर त्या ईव्हीएम घेऊन जाताना सहका-याने काढलेले छायाचित्र गाजत आहे. आहार नियंत्रण व व्यायामावर त्या भर देतात. आईचे फोटो इतके लोकप्रिय झाल्याने त्यांचा नववीतील मुलगाही खूष आहे. (वृत्तसंस्था)