कार्यालयातील कर्मचार्यांनीच लांबविली रोकड
By admin | Published: May 9, 2015 01:44 AM2015-05-09T01:44:55+5:302015-05-11T00:01:07+5:30
नाशिक : जुन्या कार विक्रीच्या व्यवहारातून जमा झालेली सुमारे दोन लाख ३१ हजार १५० रुपयांची रोकड चोरीस गेल्याची घटना चोपडा लॉन्सजवळील साईिसद्धी कार मॉलच्या कार्यालयात घडली़ या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात कार्यालयातील कर्मचार्यांवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

आशुतोष अशोक निमसे (कलानगर, पंचवटी) व ओंकार सांगळे यांचे चोपडा लॉन्सजवळील साईिसद्धी कार मॉल असून, येथे जुन्या कार विक्रीचा व्यवसाय केला जातो़ कार विक्रीतून आलेले २ लाख ३१ हजार १५० रुपये रुपयांचे बंडल तयार करून त्यांनी ते कापडी पिशवीत भरले व ती कार्यालयातील टेबलवर ठेवली होती़
गुरुवारी रात्री निमसे व त्यांच्या सहकार्यांनी कार्यालयाच्या मोकळ्या जागी जेवन केले़ यादरम्यान अज्ञात व्यक्तींनी ही पैशांची बॅग चोरून नेली़ या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी संशायित विशाल जगताप, भूषण मोरे, अनिल पाटील, सुधीर पठाडे, योगेश गढीया यांच्यावर संशयावरून चोरीचा गुन्हा दाखल केला आहे़ (प्रतिनिधी)