रोस्टरअभावी कर्मचारी भरती रखडली !
By admin | Published: August 20, 2015 10:09 PM2015-08-20T22:09:57+5:302015-08-20T22:09:57+5:30
रोस्टरअभावी कर्मचारी भरती रखडली !
Next
र स्टरअभावी कर्मचारी भरती रखडली !ठाणे-पालघर जिल्हा परिषद- प्रशासन उदासीनसुरेश लोखंडे, ठाणे : ठाणे व पालघर जिल्ह्याचे विभाजन होऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. मात्रया दोन्ही जिल्हा परिषदांसाठी आवश्यक असलेला कर्मचारी आकृतीबंध (रोस्टर) अद्यापही स्वतंत्र करण्यात आलेला नाही. यामुळे दोन्ही कार्यालयांसाठी कर्मचार्यांची भरती झालेली नाही. यामुळे सरकारी नोकरीची संधी लांबणीवर पडली आहे. यास प्रशासनाची उदासीनता कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.साधारणत: एप्रिल महिन्यात रिक्त पदांचा आढावा घेतला जातो. त्यानंतर, पदे भरण्याची प्रक्रि या सुरू होते. पण, विभाजनानंतर ठाणे व पालघर जिल्ांसाठी कर्मचारी आकृतीबंध तयार करण्यात आला नाही. यामुळे रोस्टर निित करणे शक्य झालेले नाही. ठाण्याच्या जुन्या रोस्टरनुसारच या दोन्ही जिल्हा परिषदांमध्ये सध्या कर्मचारी कार्यरत आहेत. त्यात कर्मचार्यांकडून विकल्पही घेण्यात आल्यामुळे सध्या पालघरमध्ये कार्यरत असलेले कर्मचारी मोठ्या संख्येने ठाणे जिल्ात येणार आहेत. यामुळे दोन्ही जिल्हा परिषदांमधील कर्मचारी संख्या कमीअधिक होणार आहे. पण, रोस्टरअभावी ते निित होणे अवघड असल्यामुळे भरती प्रक्रिया रखडल्याचे वास्तव आहे. राज्य सरकारने पालघर जिल्हा परिषदेला कंत्राटी पद्धतीने आवश्यक पदांची भरती करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे पालघर जिल्ात रिक्त पदांवर उमेदवारांची मोठी भरती शक्य आहे. याशिवाय, विकल्पामुळे या जिल्ातील कर्मचारीवर्ग ठाणे जिल्ात मोठ्या प्रमाणात येणार आहे. यामुळे ठाणे जिल्हा परिषदेत फारशा जागा रिक्त राहणार नाही. पण, तत्पूर्वी दोन्ही जिल्हा परिषदांचे रोस्टर वेगळे करण्याची गरज आहे. परंतु, हा राज्य शासनाच्या अखत्यारितील विषय असल्याचे ठाणे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र पाटील यांनी लोकमतला सांगितले.