Employees Provident Fund: कोट्यवधी नोकरदारांना खूशखबर, केंद्र सरकारने खात्यात जमा केली भरघोस रक्कम, फटाफट चेक करा बॅलन्स
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2022 07:54 PM2022-11-02T19:54:46+5:302022-11-02T19:55:31+5:30
Employees Provident Fund: कोट्यवधी पीएफ खातेदारांना खूशखबर आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओने ७ कोटी खातेदारांना ही खूशखबर दिली आहे. ईपीएफओने खातेदारांच्या खात्यामध्ये व्याजाचे पैसे जमा करण्यास सुरुवात केली आहे,
नवी दिल्ली - कोट्यवधी पीएफ खातेदारांना खूशखबर आहे. कर्मचारीभविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओने ७ कोटी खातेदारांना ही खूशखबर दिली आहे. ईपीएफओने खातेदारांच्या खात्यामध्ये व्याजाचे पैसे जमा करण्यास सुरुवात केली आहे, केंद्र सरकारकडून ईपीएफ खातेदारांच्या खात्यामध्ये २०२२ या आर्थिक वर्षाचे व्याज जमा करण्यास सुरुवात केली आहे. ईपीएफओने यावेळी पीएफवर ८.१ टक्के व्याज दिले आहे.
- सध्या जर तुमच्या पीएफ खात्यामध्ये १० लाख रुपये असतील तर तुमच्या खात्यामध्ये व्याजापोटी ८१ हजार रुपये जमा होतील.
- जर तुमच्या पीएफ खात्यामध्ये ७ लाख रुपये असतील तर तुम्हाला व्याजाच्या रूपामध्ये ५६ हजार ७०० रुपये जमा होतील.
- जर तुमच्या पीएफ खात्यामध्ये ५ लाख रुपये असतील तर तुमच्या खात्यामध्ये ४० हजार ५०० रुपये जमा होतील.
- जर तुमच्या खात्यामध्ये एक लाख रुपये जमा असतील तर तुम्हाला ८ हजार १०० रुपये मिळतील.
जर तुम्हाला तुमच्या खात्यामधील पीएफची रक्कम तपासायची असेल तर तुम्ही तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरून 011-22901406 या नंबरवर मिस कॉल देऊन तुमच्या खात्यामधील बॅलन्स तपासू शकता. त्यानंतर ईपीएफओकडून मेसेजच्या आधारे तुम्हाला पीएफ खात्यामधील रकमेची माहिती मिळेल. मात्र त्यासाठी तुमचा UAN, पॅनकार्ड आणि आधार कार्ड लिंक असणं आवश्यक आहे.