'लंच टाइम'मुळे बचावले कर्मचारी; DGHSच्या ऑफिसात भीषण आग
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2019 05:39 PM2019-07-05T17:39:37+5:302019-07-05T17:42:00+5:30
आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांचे कार्य सुरु आहे.
नवी दिल्ली - दिल्लीत आज दुपारी कड़कड़डूमास्थित डायरक्टरेट जनरल ऑफ हेल्थ सर्विसेजच्या (डीजीएचएस) इमारतीला बिशन आग लागली असून घटनास्थळी २ डझन अग्निशमन दलाच्या गाड्या रवाना झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांचे कार्य सुरु आहे. ही आग कशामुळे लागली हे अद्याप समजलं नाही आहे. डीजीएचएसच्या कार्यालयाला प्रथम ही भीषण आग लागली. नंतर ही संपूर्ण इमारतीत पसरली आणि वरचा मजला आगीने घेरला. मात्र, लंच टाईमदरम्यान ही आग लागल्याने सुदैवाने बरेच कर्मचारी दुपारच्या जेवणासाठी कार्यालयातून बाहेर पडले होते. जर काही वेळेआधी ही आग लागली असती तर ते बाहेर पडलेले कर्मचारी इमारतीत अडकून पडले असते अशी माहिती सूत्रांनी दिली.
#WATCH Delhi: A fire breaks out at Directorate General of Health Services (DGHS) Office, Karkardooma. Total 22 fire tender at the spot. More details awaited. pic.twitter.com/BtpMmE2j67
— ANI (@ANI) July 5, 2019
Delhi: A fire breaks out at Directorate General of Health Services (DGHS) Office, Karkardooma. Total 22 fire tender at the spot. More details awaited. pic.twitter.com/NwTClOHMWx
— ANI (@ANI) July 5, 2019