लाईट बिलाच्या वसुलीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना गावकऱ्यांनी झाडालाच बांधलं
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 09:48 PM2020-07-18T21:48:29+5:302020-07-18T21:50:12+5:30
लाईटच बील हातात घेतल्यानंतर करंट लागतो की काय, अशी परिस्थिती या लॉकडाऊन काळातील वीजबील पाहून नागरिकांची झाली आहे
मेडक- लॉकडाऊन काळात वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडून ग्राहकांना पाठविण्यात आलेलं वीज बील हे अधिक असल्याचा तक्रारी येत आहेत. यासंदर्भात महाराष्ट्रातही ऊर्जामंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून नागरिकांना त्रास होऊ देऊ नका, असे निर्देश दिले आहेत. मात्र, वीजपुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडून वीजबीलाचा तगादा लावल्यामुळे तेलंगणात नागरीक संतापल्याचे पाहायला मिळाले.
लाईटच बील हातात घेतल्यानंतर करंट लागतो की काय, अशी परिस्थिती या लॉकडाऊन काळातील वीजबील पाहून नागरिकांची झाली आहे. त्यामुळे, मेडक जिल्ह्यातील मुस्लापूर गावात पीडित नागरिकांनी वीज वितरण विभागाच्या कंपन्यांवर आपला रोष दाखवला. वीज बिलाच्या वसुलीसाठी आलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गावकऱ्यांनी चक्क खांबालाच बांधले. तसेच, वरिष्ठ अधिकारी आल्यानंतरच तुम्हाला सोडून देऊ, असा इशाराही दिला.
The officials have lodged a complaint. Based on that, an FIR has been registered against 5 people under multiple sections of IPC. All of the accused have been arrested: Krishna Murthy, Medak DSP. #Telanganahttps://t.co/1mGe7QddoS
— ANI (@ANI) July 18, 2020
वाढीव वीजबीलाची समस्या आणि सातत्याने अखंडीत वीजपुरवठ्यामुळे गावकरी चांगलेच संतापले होते. अनेकदा तक्रारी देऊनही अधिकारी लक्ष घालत नव्हते. त्यामुळे, अशारीतीने गावकऱ्यांनी आपला विरोध व्यक्त करत अधिकाऱ्यांनाच बांधून ठेवले. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर, पोलिसांनी 5 जणांना अटकही केल्याचे मेडकचे डीएसपी कृष्णमुर्ती यांनी सांगितले.