एक लाख तरुणांना राेजगार; एप्रिलपर्यंत मिळणार थेट नोकऱ्या, वरिष्ठ पदांवर महिलांना मिळणार मोठी संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 11:27 AM2022-11-22T11:27:10+5:302022-11-22T11:27:45+5:30
टीमलीज डिजिटल या संस्थेच्या एका अहवालातून गेमिंग क्षेत्रातील राेजगाराच्या संधींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. भारतात गेमिंग उद्याेगात २० ते ३० टक्के वाढ हाेण्याचा अंदाज आहे.
नवी दिल्ली : ई-काॅमर्स, ऑनलाईन शाॅपिंगशिवाय आणखी एक क्षेत्र आहे जिथे माेठ्या प्रमाणावर लहान मुले, तरुण-तरुणी आकर्षित हाेतात. ते आहे गेमिंगचे. ऑनलाईन असाे किंवा ऑफलाईन, गेमिंग ॲपचे अनेकांना वेड असते. भारतात या क्षेत्राचा झपाट्याने विस्तार हाेत असून पुढील काही वर्षांमध्ये त्यातून माेठ्या प्रमाणावर राेजगार निर्मिती हाेणार आहे.
टीमलीज डिजिटल या संस्थेच्या एका अहवालातून गेमिंग क्षेत्रातील राेजगाराच्या संधींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. भारतात गेमिंग उद्याेगात २० ते ३० टक्के वाढ हाेण्याचा अंदाज आहे.
चालू आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत सुमारे १ लाख नवे राेजगार निर्माण
हाेऊ शकतात, हे विशेष. या क्षेत्रात महिलांचा ४० टक्के वाटा आहे. भविष्यात अनेक वरिष्ठ पदांवर महिला दिसू शकतात.
या क्षेत्रात संधी वाढणार -
प्राेग्रामिंग : गेम डेव्हलपर्स, युनिटी डेव्हलपर्स
टेस्टिंग : गेम टेस्टिंग इंजिनिअरिंग, गुणवत्ता, क्यूए लीड
ॲनिमेशन डिझाईन : माेशन ग्राफिक डिझायनर, व्हर्च्युअल रिॲलिटी डिझायनर्स
कलाकार : व्हीएफएक्स, काॅन्सेप्ट आर्टिस्ट
इतर राेल्स : कंटेट लेखक, गेमिंग पत्रकार, रचनाकार
२०२६ पर्यंत २.५ लाख नव्या राेजगारनिर्मितीअपेक्षा
५० हजार सध्या लाेकांना गेमिंग उद्याेगातून राेजगार मिळत आहे.
३०% त्यात प्राेग्रामर आणि डेव्हलपर्स आहेत.
भारत दुसरी सर्वात माेठी बाजारपेठ -
- २०२६ पर्यंत गेमिंग उद्याेग ३८ हजार काेटी रुपयांपर्यंत वाढू शकताे.
- देशात सध्या सुमारे ४८ काेटी गेमर्स आहेत.
- गेमिंग उद्याेगाची जागतिक बाजारपेठ सुमारे १७.२५ लाख काेटी रुपयांची आहे.
- चीनमध्ये सर्वात माेठी बाजारपेठ आहे.
- उत्पन्नाच्या बाबतीत भारत जगातील सहावी माेठी बाजारपेठ आहे.
- चालू आर्थिक वर्षात ७८० काेटींची परकीय गुंतवणूक या क्षेत्रात शक्य
तीन पटीने वाढणार गेमिंग उद्याेग
- भारतातील गेमिंग उद्याेग २०२७ पर्यंत ३.३ पटीने वाढून सुमारे ८.६ अब्ज डाॅलर्स एवढा हाेऊ शकताे.
- विद्यमान विकास दर २७ टक्के आहे
२०२१-२२ मध्ये ५०.७ गेमर्स हाेते. त्यात १२ काेटी गेमर्स गेमसाठी पैसे माेजतात.