Teacher Job Alert: महाराष्ट्रासह 17 राज्यांमध्ये हजारो जागांवर शिक्षक भरती; पहा राज्यात जागा किती...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 01:03 PM2021-04-01T13:03:18+5:302021-04-01T13:06:23+5:30
EMRS Teacher Recruitment 2021, Government Job in Maharashtra: मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, PGT टीचर आणि TGT टीचर पदे भरली जाणार आहेत. योग्य आणि इच्छुक उमेदवारांनी 1 एप्रिल म्हणजेच आजपासून खाली दिलेल्या लिंकवर अर्ज करावा.
Sarkari Naukri, EMRS Teacher Recruitment 2021: आदिवासी कार्य मंत्रालयाने 17 राज्यांमध्ये 3479 पदांवर शिक्षक भरती जाहीर केली आहे. या भरतीद्वारे एकलव्य मॉडेल निवासी स्कूल (EMRS) मध्ये मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, PGT टीचर आणि TGT टीचर पदे भरली जाणार आहेत. योग्य आणि इच्छुक उमेदवारांनी 1 एप्रिल म्हणजेच आजपासून खाली दिलेल्या लिंकवर अर्ज करावा. (Eklavya Model Residential School Recruitment 2021: Online Application For 3479 TGT, PGT, Principal & Vice Principal Posts; Check Details)
भरती परीक्षेचे आयोजन राष्ट्रीय परीक्षण एजेंसी (NTA) करणार असून tribal.nic.in या वेबसाईटवर जाऊन अर्ज करता येणार आहे.
EMRS Teacher Notification 2021 : महत्वाच्या तारखा...
ऑनलाइन अर्ज सुरुवात: 1 एप्रिल 2021
ऑनलाइन अर्जाची अंतिम तारीख: 30 एप्रिल 2021
अर्ज शुल्क जमा करण्याची अंतिम तारीख : 30 एप्रिल 2021
परीक्षा : जूनच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा होणार आहे. याची नेमकी तारीख नंतर जाहीर करण्यात येईल.
EMRS Teacher Recruitment 2021 Vacancy Details: पदांचे विवरण:
प्रिंसिपल - 175 पदे
व्हाईस प्रिंसिपल - 116 पदे
पोस्ट ग्रॅजुएट टीचर- 1244 पदे
ट्रेंड ग्रॅजुएट टीचर - 1944 पदे
एकूण - 3479
या भरतीनुसार महाराष्ट्रात एकूण 216 जागा भरायच्या आहेत.
शिक्षणाची अट....
प्रिंसिपल, व्हाईस प्रिंसिपल आणि पोस्ट ग्रॅजुएट टीचर पदासाठी उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कमीतकमी 50 टक्क्यांनी उत्तीर्ण झाल्याची पोस्ट ग्रॅज्युएशनची पदवी असणे गरजेचे आहे. सोबत बीएड किंवा समकक्ष पात्रतेची पदवी व कॉम्प्युटरचे ज्ञान असणे बंधनकारक आहे.
प्रिंसिपल, व्हाईस प्रिंसिपल पदासाठी अनुभवींना प्राधान्य दिले जाणार आहे. तर पोस्ट ग्रॅजुएट टीचरसाठी उमेदवाराला हिंदी किंवा इंग्रजीमध्ये प्राविण्य लागणार आहे.
याशिवाय टीजीटी पदासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी घेतल्याचे प्रमाणपत्र, ५० टक्के अट. तसेच बीएड किंवा समकक्ष पदवी असायला हवी. अन्य माहितीसाठी खाली नोटिफिकेशन लिंक देण्यात आली आहे.
निवड...
आदिवासी कार्य मंत्रालय भरती 2021 साठी उमेदवारांची निवड ही कॉम्प्युटरवर आधारीत परिक्षेद्वारे केली जाणार आहे. यानंतर मुलाखत घेतली जाणार आहे.
अधिकृत नोटिफिकेशनसाठी इथे क्लिक करा...
अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी इथे क्लिक करा...