दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2024 06:54 PM2024-11-17T18:54:26+5:302024-11-17T18:56:12+5:30

बालाघाटच्या कुंडुल जंगलात नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक झाली आहे. पोलिसांच्या पथकावर नक्षलवाद्यांनी अचानक हल्ला केला.

Encounter between police and Naxalites in Duglai forest, one jawan injured | दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी

दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी

बालाघाटातील रुपझार पोलीस स्टेशनच्या सोनगुड्डा अंतर्गत कुंडुल जंगलात रविवारी १७ नोव्हेंबर रोजी दुपारी ११ ते १२ वाजेच्या दरम्यान पोलीस शोध पथक आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत हॉक फोर्सचे हवालदार शिवकुमार शर्मा जखमी झाले. त्यांना उपचारासाठी गोंदिया येथे रेफर करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नक्षलविरोधी मोहिमेचा एक भाग म्हणून रविवारी हॉक फोर्सच्या पथकांकडून माहितीच्या आधारे विशेष मोहीम राबविण्यात येत होती. विशेष मोहिमेदरम्यान कुंडुल हिल जंगल परिसरात पोलीस दलाच्या हॉक फोर्स एसओजी उकवाचे जवान गणवेशातील १२ ते १५ सशस्त्र नक्षलवाद्यांशी समोरासमोर आले.

नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव

पोलिसांना पाहताच नक्षलवाद्यांनी पोलिसांवर हल्ला केला. सुरक्षा दलांनी जीवाची पर्वा न करता नक्षलवाद्यांना प्रत्युत्तर दिले. पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत हॉक फोर्सचे हवालदार गंभीर जखमी झाले.

पोलिसांच्या प्रत्युत्तरादाखल कारवाईमुळे नक्षलवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत जंगलाच्या दिशेने पळ काढला. या घटनेवरून रुपझर पोलिस ठाण्यात नक्षलवाद्यांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळावरून पळून गेलेल्या नक्षलवाद्यांना पकडण्यासाठी मोठ्या सुरक्षा दलांनी परिसरात सखोल शोधमोहीम सुरू केली आहे.

Web Title: Encounter between police and Naxalites in Duglai forest, one jawan injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस