जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या जवानांकडून दहशतवाद्यांना घेराव, चकमक सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 09:13 AM2018-08-24T09:13:16+5:302018-08-24T09:13:42+5:30
जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात भारतीय लष्कर आणि एसओजी यांनी संयुक्तरित्या दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन सुरु केले आहे. लष्कराने अनंतनागमधील कोकरनाग परिसरात असणा-या दोन-तीन दहशतवाद्यांना घेराव घातला आहे.
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात भारतीय लष्कर आणि एसओजी यांनी संयुक्तरित्या दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन सुरु केले आहे. लष्कराने अनंतनागमधील कोकरनाग परिसरात असणा-या दोन-तीन दहशतवाद्यांना घेराव घातला आहे. तसेच, लष्कर आणि दहशतवादी यांच्यात चकमत सुरु आहे. दरम्यान, सुरक्षतेच्या कारणावरुन येथील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय लष्काराच्या राष्ट्रीय रायफल्सला गुरुवारी रात्री कोकरनागमधील एका घरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर येथील पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपसोबत लष्कराच्या जवानांनी या परिसरात सर्च ऑपरेशन सुरु केले. यावेळी कोकरनागमधील घरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी अंधारातून जवानांवर गोळीबार करुन पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, जवानांनी दिलेल्या चोख प्रत्युत्तरामुळे दहशतवाद्यांचे पळून जाणे अपयशी ठरले. जवानांनी दहशतवाद्यांना घेराव घातला आहे.
Jammu & Kashmir: Encounter underway between security forces and terrorists in Anantnag's Kokernag. 3 terrorists are reportedly trapped. Further details awaited. pic.twitter.com/TkTHhzHERP
— ANI (@ANI) August 24, 2018