जम्मू काश्मीर : पुलवामामध्ये जवानांसोबत झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचा खात्मा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2017 08:40 AM2017-12-26T08:40:51+5:302017-12-26T14:53:54+5:30
जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलानं मंगळवारी सकाळी (26 डिसेंबर) दहशतवाद्यांविरोधात मोठी मोहीम फत्ते केली.
श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलानं मंगळवारी सकाळी (26 डिसेंबर) दहशतवाद्यांविरोधात मोठी मोहीम फत्ते केली. दक्षिण काश्मीरमधील अवंतीपोरामध्ये दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली. यानंतर जवान व दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. या चकमकीदरम्यान, जवानांनी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदच्या एका टॉपच्या कमांडरचा खात्मा केला.
पुलवामा परिसरात दोन दहशतवादी शिरल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली. यानंतर तातडीनं परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली. संपूर्ण परिसरात भारतीय लष्करातील जवानांनी एसओजी व सीआरपीएफसोबत मिळून शोध मोहीम सुरू केली. ज्या घरात दहशतवादी लपले त्या परिसराला जवानांनी घेराव घातला. चारही बाजूंनी घेराव घातल्यानंतर दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. दहशतवाद्यांच्या या हल्ल्याला जवानांनी चोख प्रत्युत्तर देत एका द दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. नूर मोहम्मद असे ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्याचं नाव असून तो दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा टॉपचा कमांडर असल्याची माहिती समोर आली आहे.
#UPDATE One terrorist killed in an ongoing encounter between security forces and terrorists in J&K's Pulwama; Search operation underway
— ANI (@ANI) December 26, 2017
#Visuals Encounter underway between security forces and terrorists in J&K's Pulwama; One terrorist killed, search operation underway. pic.twitter.com/07o29qAPDz
— ANI (@ANI) December 26, 2017
दरम्यान, जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलाकडून 'ऑपरेशन ऑल आउट' सुरू करण्यात आले असून या अंतर्गत 203 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. गेल्या 3 वर्षांतील ही आकडेवारी सर्वाधिक असल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, 2017मध्ये जम्मू काश्मीरमध्ये 10 डिसेंबरपर्यंत 203 दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे तर 2016 मध्ये 148 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता व 2015 मध्ये 108 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते.