जम्मू-काश्मीरमधील तीन ठिकाणी एन्काऊंटर सुरू; एका दहशतवाद्याचा खात्मा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 08:17 AM2018-09-27T08:17:07+5:302018-09-27T08:20:20+5:30
बडगाम, अनंतनाग, श्रीनगरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक
श्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. अनंतनाग जिल्ह्यापासून दुरू शाहबादमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. तर श्रीनगर शहराजवळील नूरबाग सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांनी घेरलं आहे. सध्या या ठिकाणी दोन्ही बाजूनं गोळीबार सुरू आहे.
#JammuAndKashmir: Visuals from Srinagar city's Noorbagh where an encounter has started between terrorists & security forces. Two terrorists are believed to be trapped. Internet services have been suspended. (Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/QCDTMMUtlE
— ANI (@ANI) September 27, 2018
सध्या जम्मू-काश्मीरमधील तीन ठिकाणी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. बडगाममधील चादोरातील एका इमारतीमध्ये तीन दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली. त्यामुळे जवानांनी या इमारतीला घेराव घातला. तर श्रीनगर शहराजवळील नूरबामध्येही दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक सुरू आहे. याठिकाणी दोन दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी घेराव घातला. खबरदारीचा उपाय म्हणून या भागातील इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली आहे. अनंतनागमधील दुरू शहाबादमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी एका दहशतवाद्याला कंठस्नान घातलं आहे. सध्या या भागात सुरक्षा दलांचं सर्च ऑपरेशन सुरू आहे.
#UPDATE: One terrorist has been killed in the encounter in Dooru Shahabad in Anantnag district. Firing has stopped. Search operation is underway. #JammuAndKashmirhttps://t.co/b3p1A79uim
— ANI (@ANI) September 27, 2018