अनंतनागमध्ये दहशतवाद्यांसोबत चकमक, लष्कराच्या दोन जवानांना वीरमरण, तीन जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 08:13 PM2024-08-10T20:13:54+5:302024-08-10T20:19:52+5:30
Encounter In Anantnag: जम्मू काश्मीरमदील अनंतनाग जिल्ह्यामध्ये भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन जवानांना वीरमरण आलं आहे. तर तीन जवान जखमी झाल्याचं वृत्त आहे.
जम्मू काश्मीरमदील अनंतनाग जिल्ह्यामध्ये भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन जवानांना वीरमरण आलं आहे. तर तीन जवान जखमी झाल्याचं वृत्त आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, दहशतवाद्यांचे पळून जाण्याचे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहे.
पोलिसांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, अनंतनाग जिल्ह्यातील कोकरानाग येथील अहलान परिसरामध्ये दहशतवादी आणि लष्करादरम्यान, चकमक सुरू आहे. पोलीस आणि लष्कराच्या एका पथकाने गोपनीय माहितीच्या आधारावर अहलान येथे नाकेबंदी केली. तसेच शोधमोहीम हाती घेतली.
#UPDATE | Based on specific intelligence input, a joint operation was launched by Indian Army, J&K Police and CRthe PF Srinagar today in the general area Kokernag, Anantnag. Contact was established and a firefight ensued. Two personnel have been injured and evacuated from the… pic.twitter.com/tzp9xxQplE
— ANI (@ANI) August 10, 2024
त्यांनी पुढे सांगितले की, शोधमोहिमेदरम्यान, लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षादलांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. त्यामुळे चकमकीला तोंड फुटले. गोळीबार अद्यापही सुरू आहे. जम्मू काश्मीरमधून दहशतवाद संपुष्टात आणण्यासाठी सुरक्षा दलांकडून दहशतवादी आणि त्यांना आश्रय देणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरू आहे.