सफाईबाबत पंतप्रधानांकडे तक्रार करणार्याचेच गटारीवर अतिक्रमण आरोग्य: मनपाच्या पाहणीत उघड झाला प्रकार
By admin | Published: July 29, 2016 12:28 AM2016-07-29T00:28:30+5:302016-07-29T00:28:30+5:30
जळगाव: सिंधी कॉलनी, कंवररामनगरातील रतन सोढी यांनी घरामागील गटारीची सफाई मनपाकडून होत नसल्याबद्दल पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेत पंतप्रधान कार्यालयाने घेत राज्य शासनामार्फत मनपाला विचारणाही केली. मात्र मनपाच्या अधिकार्यांनी केलेल्या पाहणीत तक्रारदारासह परिसरातील नागरिकांनीच गटारीवर अतिक्रमण केल्याने तसेच गटारीतून पिण्याच्या पाण्याचे पाईप गेलेले असल्याने सफाई करण्यात अडथळा होत असल्याचे आढळून आले.
Next
ज गाव: सिंधी कॉलनी, कंवररामनगरातील रतन सोढी यांनी घरामागील गटारीची सफाई मनपाकडून होत नसल्याबद्दल पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेत पंतप्रधान कार्यालयाने घेत राज्य शासनामार्फत मनपाला विचारणाही केली. मात्र मनपाच्या अधिकार्यांनी केलेल्या पाहणीत तक्रारदारासह परिसरातील नागरिकांनीच गटारीवर अतिक्रमण केल्याने तसेच गटारीतून पिण्याच्या पाण्याचे पाईप गेलेले असल्याने सफाई करण्यात अडथळा होत असल्याचे आढळून आले. नागरिक सोढी यांनी त्यांच्या घराच्या पाठीमागील गटारीची सफाई होत नसल्याची तक्रार पंतप्रधान कार्यालयाच्या पोर्टलवर अपलोड केली होती. त्यामुळे पंतप्रधान कार्यालयाने राज्यशासनास कळविले. राज्य शासनाच्या कक्ष अधिकार्यांनी याबाबत मनपास कळवून सफाई करून माहिती पंतप्रधान कार्यालयाच्या पोर्टलवर अपलोड करण्याचे आदेश दिले. पहिल्यांदा तक्रार आली तेव्हा १ जुलै रोजी नाल्यातील अडकलेला कचरा काढला होता. मात्र त्यानंतरही सफाई न झाल्याची ओरड झाल्याने पाहणी केली असता हा प्रकार आढळून आला.