द्वारकावरील व्यावसायिकांचा मनपाकडून इनकॅमेरा जबाब अतिक्रमण : १४ सप्टेंबरला सुनावणी
By admin | Published: September 7, 2015 11:27 PM2015-09-07T23:27:32+5:302015-09-07T23:27:32+5:30
नाशिक : द्वारकावर महापालिकेच्या जागेवर अतिक्रमण करणार्या व्यावसायिकांना अतिक्रमण विभागाने नोटिसा बजावल्यानंतर सोमवारी उपआयुक्तांपुढे सदर व्यावसायिकांचे इनकॅमेरा जबाब नोंदवून घेण्यात आले. यावेळी ५५ व्यावसायिकांनी हजेरी लावली असली तरी, त्यातील केवळ १० व्यावसायिकांनीच जबाब दिले असून, उर्वरित व्यावसायिकांनी मुदत मागून घेतली आहे. दरम्यान, द्वारकावरीलच ३३ व्यावसायिकांनी जिल्हा न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यात मनपाने मुदत मागवून घेतल्याने पुढील सुनावणी १४ सप्टेंबरला होणार आहे.
Next
न शिक : द्वारकावर महापालिकेच्या जागेवर अतिक्रमण करणार्या व्यावसायिकांना अतिक्रमण विभागाने नोटिसा बजावल्यानंतर सोमवारी उपआयुक्तांपुढे सदर व्यावसायिकांचे इनकॅमेरा जबाब नोंदवून घेण्यात आले. यावेळी ५५ व्यावसायिकांनी हजेरी लावली असली तरी, त्यातील केवळ १० व्यावसायिकांनीच जबाब दिले असून, उर्वरित व्यावसायिकांनी मुदत मागून घेतली आहे. दरम्यान, द्वारकावरीलच ३३ व्यावसायिकांनी जिल्हा न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यात मनपाने मुदत मागवून घेतल्याने पुढील सुनावणी १४ सप्टेंबरला होणार आहे. द्वारकावरील अतिक्रमण हटविण्याबाबत महापालिकेने व्यावसायिकांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या होत्या. त्यानुसार सोमवारी अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त रोहिदास बहिरम यांच्या समोर व्यावसायिकांचे जबाब नोंदविण्यात आले. परंतु ५५ व्यावसायिकांपैकी केवळ १० व्यावसायिकांनीच जबाब नोंदवले, तर अन्य व्यावसायिकांनी आपले म्हणणे मांडण्यासाठी मुदत देण्याची विनंती केली. त्यानुसार संबंधिताना नंतर सुनावणीसाठी बोलावले जाणार आहे. व्हिडीओ चित्रीकरणात सदर व्यावसायिकांचे जबाब नोंदविण्यात आले. दरम्यान, ३३ व्यावसायिकांनी जिल्हा न्यायालयात दाखल केलेल्या अपिलावर सोमवारी सुनावणी होणार होती. परंतु महापालिकेला जबाब नोंदविण्यासाठी मुदत वाढवून देण्याची विनंती महापालिकेचे वकील विश्वास पारख यांनी केल्यानंतर न्यायालयाने पुढील सुनावणी १४ सप्टेंबरला निश्चित केली.