भर रस्त्यात भाजी व फळ विक्रेत्यांचे अतिक्रमण समस्या : वाहनचालकांना चालताना होते अडचण; कारवाई करण्यात प्रशासन अपयशी

By admin | Published: November 19, 2015 12:09 AM2015-11-19T00:09:50+5:302015-11-19T00:09:50+5:30

जळगाव : शहरातील महात्मा गांधी मार्केट परिसरात भाजी व फळ विक्रेत्यांनी भर रस्त्यात अतिक्रमण केले आहे. त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणार्‍या वाहनचालकांना अडचणीचे ठरत आहे. अशा परिस्थितीत मनपाचा अतिक्रमण विभाग मूग गिळून बसला असून कारवाई करण्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्याचा नाहक फटका सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे.

The encroachment problem of vegetable and fruit vendors across the road: Problems driving the drivers; Administration fails to take action | भर रस्त्यात भाजी व फळ विक्रेत्यांचे अतिक्रमण समस्या : वाहनचालकांना चालताना होते अडचण; कारवाई करण्यात प्रशासन अपयशी

भर रस्त्यात भाजी व फळ विक्रेत्यांचे अतिक्रमण समस्या : वाहनचालकांना चालताना होते अडचण; कारवाई करण्यात प्रशासन अपयशी

Next
गाव : शहरातील महात्मा गांधी मार्केट परिसरात भाजी व फळ विक्रेत्यांनी भर रस्त्यात अतिक्रमण केले आहे. त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणार्‍या वाहनचालकांना अडचणीचे ठरत आहे. अशा परिस्थितीत मनपाचा अतिक्रमण विभाग मूग गिळून बसला असून कारवाई करण्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्याचा नाहक फटका सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे.
महात्मा गांधी मार्केट परिसरात दररोज शेकडो व्यावसायिक कुटुंबाचा उदरनिर्वाहासाठी व्यवसाय करतात. परंतु, त्यांनी अनधिकृतपणे तेथे उपलब्ध असलेल्या जागेवर सर्रासपणे अतिक्रमण थाटले आहेत.
नेहमीच होते वाहतुकीची कोंडी
टॉवर चौकापासून पुढे शनिपेठ पोलीस चौकीपर्यंत विक्रेत्यांनी रस्त्याच्या दुतर्फा दुकाने थाटली आहेत. विक्रेत्यांना बसण्यासाठी वाहतूक शाखेतर्फे झेब्रा क्रॉसिंग प˜्या आखून देण्यात आल्या होत्या. मात्र, नियमांचे उल्लंघन करून विक्रेत्यांनी या प˜्यांच्या पुढेच दुकाने लावली आहेत. त्यामुळे या परिसररात दररोज वाहतुकीची कोंडी वारंवार होताना दिसते. त्यात टॉवर चौकातील सिग्नल यंत्रणा बर्‍याचदा बंद असते. त्यात वाहतुकीची कोंडीमुळे झाल्यानंतर नागरिकांना त्याचा फटका सहन करावा लागतो.
फेरीवाल्यांचा त्रास
महात्मा गांधी मार्केट परिसरात फेरीवाले विक्रेत्यांचा त्रास दिवसागणिक वाढत आहे. या परिसरातील बळीराम पेठ व शनीपेठ परिसरात अनेक फेरीवाले व्यवसाय करतात. अनेकदा या फेरीवाल्यांना वाहतूक पोलीस शाखेच्या कर्मचार्‍यांनी उठवून देतात. त्यामुळे ते विक्रेते त्यांचे बस्थान दुसरीकडे मांडतात. अशा परिस्थितीत फेरीवाल्यांना ज्या ठिकाणी रिकामी जागा दिसेल. त्याच ठिकाणी ते अतिक्रमण करून त्यांचा व्यवसाय करतात.
खुल्या भूखंडावर मातीचे ढिग
महात्मा गांधी परिसरातील व्यापारी संकुलात खरेदीसाठी येणार्‍या नागरिकांना त्यांची वाहने पार्किंग करण्यासाठी जागा नाही. या मार्केटच्या बाजूला महापालिकेचा खुला भूखंड गेल्या अनेक दिवसांपासून पडीक आहे. परंतु, या भूखंडावर कचरा व मातीचे मोठे ढिग टाकून ठेवल्यामुळे नागरिकांना त्यांची वाहने रस्त्यातच उभी करावी लागतात. त्यात चारचाकी वाहनांचे चालक रस्त्याच्या मधोमध गाडी लावून खरेदीसाठी तासन्तास जात असल्याने रस्त्यावर सुरू असलेल्या वाहतुकीला अडथळा निर्माण होतो.

Web Title: The encroachment problem of vegetable and fruit vendors across the road: Problems driving the drivers; Administration fails to take action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.