बंगालमधील दोन गिधाडांना लावले रेडिओ टॅग, देशातील पहिलाच प्रयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2020 05:54 PM2020-09-08T17:54:44+5:302020-09-08T18:00:57+5:30
रेडिओ टॅग लावलेल्या दोन गिधाडांना पश्चिम बंगालच्या वनक्षेत्रात सोडण्याचा प्रयोग बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी आणि पश्चिम बंगाल वन विभागाने राबविला आहे. हे दोन्ही विभाग या गिधाडांच्या ब्रीडिंग सेटरमधील हालचालींचे निरिक्षण करणार आहेत. हा देशातील पहिलाच प्रयोग आहे.
संदीप आडनाईक
कोल्हापूर : रेडिओ टॅग लावलेल्या दोन गिधाडांना पश्चिम बंगालच्या वनक्षेत्रात सोडण्याचा प्रयोग बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी आणि पश्चिम बंगाल वन विभागाने राबविला आहे. हे दोन्ही विभाग या गिधाडांच्या ब्रीडिंग सेटरमधील हालचालींचे निरिक्षण करणार आहेत. हा देशातील पहिलाच प्रयोग आहे.
सुमारे महिन्यापूर्वी हिमालयीन ग्रिफन जातीच्या दोन गिधाडांना संशोधकांच्या मदतीने डमी ट्रान्समिटर्स बसविले आहेत. बंगालच्या राजाभक्तवा गिधाड ब्रीडींग सेंटरमधील या गिधाडांवर हा प्रयोग केला आहे. उत्तर बंगालच्या अलिपूरदौर जिल्ह्यातील बक्सा व्याघ्र प्रक्लपांतर्गत पाच एकरात हे केंद्र चालविले जाते.
या केंद्रात ८६ पांढऱ्या पाठीचे, १७ निमुळत्या चोचीचे आणि २७ लांब चोचीचे गिधाडे आहेत. याशिवाय या केंद्रात जन्म घेतलेल्या गिधाडांची संख्या ६0 आहे. वन खाते आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने गिधाड संवर्धनासाठी आठ वेगवेगळ्या राज्यात ब्रीडिंग सेंटर्स सुरु करण्यात आले आहेत.
गिधाडांच्या जंगलातील हालचाली समजून घेण्यासाठी हा प्रयोग केला आहे. अशाप्रकारचा हा पहिलाच प्रयत्न आहे. सहा गिधाडांना जंगल प्रदेशात सोडण्यात आले आहेत आणि त्यातील दोन गिधाडांना डमी ट्रान्समीटर्स बसविले आहेत.
विभू प्रकाश,
संशोधक संचालक, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी.