... तर गुजरातमध्ये 'मे' महिनाअखेरपर्यंत ८ लाख कोरोनाग्रस्त आढळतील
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 01:12 PM2020-04-25T13:12:31+5:302020-04-25T13:15:28+5:30
अहमदाबाद महानगरपालिका आयुक्त विजय नेहरा यांनी एक व्हिडीओ संदेश जारी करत राज्यातील आणि अहमदाबादमधील कोरोना परिस्थितीबाबत भाष्य केले.
अहमदाबाद - गुजरातच्याअहमदाबाद शहरात कोरोना व्हायरसा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. गेल्या ४ दिवसांत रुग्णांची संख्या दुप्पटीने वाढत असून ही धोक्याची घंटा असल्याचं सांगण्यात येत आहे. रुग्णवाढीचा हा आकडा असाच दुप्पट राहिल्यास मे महिना अखेरपर्यंत गुजरातमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या जवळपास ८ लाखांपर्यंत पोहचणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. राज्यातील एका सरकारी अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. गुजरामध्ये आतापर्यंत सर्वाधिक १६३८ कोरोनाग्रस्त अहमदाबाद शहरात आढळून आले आहेत.
भीषण आगीत १०० ते १५० घरे जळून खाक, लॉकडाऊनमध्येच रहिवाशी झाले बेघर
अहमदाबाद महानगरपालिका आयुक्त विजय नेहरा यांनी एक व्हिडीओ संदेश जारी करत राज्यातील आणि अहमदाबादमधील कोरोना परिस्थितीबाबत भाष्य केले. अहमदाबादमध्ये १४५९ रुग्ण अद्यापही कोरोना संक्रमित असून ७५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १०५ रुग्णांची प्रकृती ठिक आहे. नेहरा म्हणाले की, सद्यस्थितीत अहमदाबाद येथे रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा दर ४ दिवसांचा आहे. याचाच अर्थ दर ४ दिवसाल रुग्णांची संख्या दुप्पट होते. जर हा आकडा असाच सुरु राहिला तर, १५ मे पर्यंत अहमदाबादमध्ये ५० हजार रुग्ण आढळतील. तर, ३१ मे पर्यंत ही संख्या ८ लाखांपर्यंत पोहोचले, अशी भीतीही नेहरा यांनी वर्तवली आहे.
सध्या ४ दिवसांचा दर कमी करुन रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ८ दिवसांवर नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसे पाहिले तर हा खूप कठीण प्रसंग आहे, कारण जगातील काही देशांनाच यावर विजय मिळवता आला आहे. सध्या अमेरिका आणि युरोपमध्ये दर चार दिवसाला रुग्णांची संख्या दुप्पट होत आहे. तर दक्षिण कोरोयात ८ दिवसाला रुग्णांची संख्या दुप्पट होत आहे. जर, आपण ४ दिवसांचा दर कमी करुन ८ दिवसांवर नेला, तर १५ मे पर्यंत रुग्णांची संख्या ५० हजारांऐवजी १० हजार होईल. आणि ८ लाखांऐवजी हा आकडा ५० हजारांवर आटोक्यात आणता येईल, असेही नेहरा यांनी सांगतिले. दरम्यान, कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असून महाराष्ट्रातही हा आकडा वाढत आहे.