आता दुश्मनांना दिसणार नाहीत जवान, आर्मी टेंटसाठी लय भारी 'नेट'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 07:09 PM2021-12-17T19:09:06+5:302021-12-17T19:11:40+5:30
आर्मी टेंटच्या वरील बाजूस या जाळ्याचं आच्छादन असणार आहे. या जाळीत लागव्यात आलेला सिंथेटीक फॅब्रिक हे रडारमधून निघणाऱ्या तरंगांना पसरवतो, त्यामुळे दुश्मनांच्या नजरेतून सहजपणे वाचणे शक्य आहे.
कानपूर - सैन्यातील जवानांना दुश्मनांना चकवा देण्यासाठी मोठी मेहनत करावी लागते. आपल्या जीवावार उदार होऊन ते भारतभूमीसाठी लढत असतात. या सैन्यातील जवानांच्या संरक्षणासाठी आता मजबूत तंबू जाळे बनविण्यात आले आहे. सिंथेटीक नेट कामा फ्लॅगद्वारे आता जवानांना सीमारेषेवर संरक्षण मिळणार आहे. जंगल असो, वाळवंट असो किंवा बर्फाच्छादित प्रदेश असो त्यांचे अस्तित्व दुश्मनांना समजणारच नाही. कानपूरच्या ट्रूप कंफट्स लिमिटेडच्या ओईएफमध्ये हा अत्याधुनिक तंबू तयार होत आहेत.
आर्मी टेंटच्या वरील बाजूस या जाळ्याचं आच्छादन असणार आहे. या जाळीत लागव्यात आलेला सिंथेटीक फॅब्रिक हे रडारमधून निघणाऱ्या तरंगांना पसरवतो, त्यामुळे दुश्मनांच्या नजरेतून सहजपणे वाचणे शक्य आहे. ओईएफ कानपूर येथे जवानांच्या टेंटचे हे जाळे 8 तासांत तयार होते. या एका जाळीत एकूण 12 जवान सहजपणे राहू शकतात. तसेच, अत्याधुनिक शस्त्रास्त्र पूर्णपणे सुरक्षित राहू शकतील. आच्छादित जाळीच्या आवरणाचं वैशिष्ट - आच्छादित जाळं हे सर्विलांससाठी निघणाऱ्या इंफ्रारेड किरणांना परावर्तीत करते. या जाळीने झाकलेल्या सर्वच वस्तू काळ्या दिसून येतील. त्यामुळे, दुश्मनांना या तंबूतील जवान आणि त्यांच्याकडील शस्त्रात्रे दिसून येत नाहीत.
सीयाचीन, चीन बॉर्डरवर उणे 30 ते उणे 50 तापमानात सैन्याच्या जवानांना देशाचं रक्षण करण्यासाठी उभे राहवं लागतं. या जवानांना टेंट जाळीतील बुखारी हे उपकरण उब देण्याचं काम करेल. त्यामुळेच सैन्यदलाच्या, बीएसएफ, सीआरपीएफ, पैरामिलिट्री फोर्समध्ये या उपकरणाची मागणी वाढली आहे.