एका गोळीत शत्रूचं जहाज होणार उद्ध्वस्त, भारतीय नौदलाला मिळणार खास गन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 02:28 PM2023-11-29T14:28:01+5:302023-11-29T14:28:20+5:30
Indian Navy: ही गन एका खास प्रकारची ऑटोकॅनन आहे. म्हणजेच एक ऑटोमॅटिक तोफ आहे. तिच्या गोळ्या सामान्य तोफगोळ्यांपेक्षा लहान पण मोठ्या मशीनगनच्या गोळ्यांपेक्षा मोठ्या आहेत.
भारतीय नौदलाला लवकरच १६ सुपर रॅपिड गन माऊंट मिळणार आहे. त्यासाठी संरक्षण मंत्रालयाने BHEL हरिद्वारसोबत करार केला आहे. हा करार २९५६.८९ कोटी रुपयांना झाला आहेत. ही गन एका खास प्रकारची ऑटोकॅनन आहे. म्हणजेच एक ऑटोमॅटिक तोफ आहे. तिच्या गोळ्या सामान्य तोफगोळ्यांपेक्षा लहान पण मोठ्या मशीनगनच्या गोळ्यांपेक्षा मोठ्या आहेत.
या गनची डिझाइन आणि निर्मिती सर्वप्रथम इटलीची कंपनी OTO Melara ने केली होती. मात्र भारतामध्ये परवान्यासह तिची निर्मिती होते. त्याचा वापर अँटी मिसाईल पॉईंट डिफेन्स, अँटी एअरक्राफ्ट, अँटी सरफेस आणि ग्राऊंड सपोर्टसाठी करता येतो.
या बंदुकीमध्ये अनेक प्रकारच्या गोळ्या वापरता येऊ शकतात. ही बंदूक सर्वसाधारणपणे ७.५ टन वजनाची असते. तिची नळी म्हणजेच बॅरल ६३ कॅलिबर आणि १८६ इंच लांब असतो. यात वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक गोळीचं वजन हे १२.५ किलोग्रॅम असते. तसेच फायरिंगनंतर जे आवरण पडते, त्याचंच वजन जवळपास ६.३ किलो एवढं असतं. या गनची उणे १५ ते ८५ डिग्रीपर्यंत वळू शकते. त्यामुळे समोरचा कुठलाही शत्रू तिच्या टप्प्यात येतो.
भारतीय नौदलाच्या विशाखापट्टणम, कोलकाता, राजपूत, गोदावरी, ब्रह्मपुत्र, शिवालिक, कोर, कमोर्ता, वीर आणि आयएनएस विक्रांतवर ही गन तैनात आहे.