धाड पडताच ईडीच्या टीमवर हल्ला, ईडीचे संचालक जखमी; दिल्लीतील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 11:31 AM2024-11-28T11:31:21+5:302024-11-28T11:32:19+5:30

Enforcement Directorate (ED) News: दिल्लीमध्ये ईडीच्या पथकाने धाड टाकली. ईडीच्या अधिकाऱ्यांवर काही जणांनी प्राणघातक हल्ला केला. 

Enforcement Directorate team attacked in Delhi Bijwasan area while conducting raids | धाड पडताच ईडीच्या टीमवर हल्ला, ईडीचे संचालक जखमी; दिल्लीतील धक्कादायक घटना

धाड पडताच ईडीच्या टीमवर हल्ला, ईडीचे संचालक जखमी; दिल्लीतील धक्कादायक घटना

Attack on ED Team in Delhi: दिल्लीत एक धक्कादायक घटना घडली. एका प्रकरणाची चौकशी करत असलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांनी एका ठिकाणी धाड टाकली. ईडीचे अधिकारी त्या ठिकाणी पोहोचताच काही त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. गुरुवारी (२८ नोव्हेंबर) सकाळी ही घटना घडली. यात ईडीचे अतिरिक्त संचालक जखमी झाले आहेत. 

ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाच्या टीमने सायबर घोटाळ्याशी संबंधित मनी लॉड्रिंग प्रकरणी धाडी टाकल्या. ईडीच्या पथकाने २८ नोव्हेंबर रोजी धाड टाकल्यानंतर हल्ला करण्यात आला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्लीतील बिज्वासन भागात ही घटना घडली.   

ईडीवर हल्ला प्रकरण काय?

PPPYL सायबर अॅप घोटाळा प्रकरणाचा तपास ईडीकडून सुरू आहे. या प्रकरणात अशोक शर्मा आणि त्यांच्या भावावर आरोप आहेत. या दोघांसह काही ईडीच्या पथकावर हल्ला केला. या प्रकरणी ईडी अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

देशभरात कार्यान्वित असलेल्या सायबर क्राइम नेटवर्कशी संबंधित असलेल्या सीएवर (top chartered accountants) ईडीने छापेमारी केली. हजारो सायबर क्राइम घटनातील पैसे मनी लॉड्रिंगद्वारे वळवल्याचे समोर आले होते. त्यानंतर ईडीने ही कारवाई सुरू केली आहे. 

ईडीने दिल्लीतील बिज्वासन भागात धाड टाकली. ईडीचे पथक आल्यानंतर त्यांच्यावर अशोक शर्मा, त्याच्या भावाने हल्ला केला. यात ईडीचे अतिरिक्त संचालक जखमी झाले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. 

Web Title: Enforcement Directorate team attacked in Delhi Bijwasan area while conducting raids

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.