मित्राच्या बर्थ डे पार्टीवरून परतताना काळाचा घाला; कारला आग लागून इंजिनियरसह एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2023 11:14 AM2023-11-26T11:14:22+5:302023-11-26T11:32:07+5:30

इंजिनियर तरुणासह त्याच्या मित्राला कारबाहेर पडण्याचीही संधी मिळाली नाही. काही क्षणांतच कार जळून खाक झाली.

Engineer and his friend killed in Swift car fire | मित्राच्या बर्थ डे पार्टीवरून परतताना काळाचा घाला; कारला आग लागून इंजिनियरसह एकाचा मृत्यू

मित्राच्या बर्थ डे पार्टीवरून परतताना काळाचा घाला; कारला आग लागून इंजिनियरसह एकाचा मृत्यू

नोएडा : कारने अचानक पेट घेतल्याने दोन तरुणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना नोएडा शहरात घडली आहे. मित्राच्या बर्थ डे पार्टीवरून परतत असताना ही दुर्घटना घडली आहे. विजय चौधरी आणि अनस अशी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या युवकांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विजय चौधरी हा सॉफ्टवेअर इंजिनियर तरुण मित्राच्या बर्थ डे पार्टीला जातो, असं सांगून आपल्या स्विफ्ट कारमधून शुक्रवारी रात्री घराबाहेर पडला होता. शुक्रवारी पार्टी केल्यानंतर शनिवारी सकाळी ते आम्रपाली प्लॅटिनियम या सोसायटीखाली आले आणि तिथे काही वेळासाठी थांबले. दोघेही कारमध्ये गप्पा मारत असताना अचानक कारने पेट घेतला. हा प्रकार लक्षात येताच सोसायटीच्या सुरक्षारक्षकाने फोनद्वारे अग्निशमन दलाला माहिती दिली. 

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी झाले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. विजय आणि त्याच्या मित्राला कारबाहेर पडण्याचीही संधी मिळाली नाही. काही क्षणांतच कार जळून खाक झाली आणि आतमध्ये असलेल्या दोघांचाही होरपळून मृत्यू झाला. "आम्ही घटनास्थळी दाखल झालो तेव्हा आम्हाला कारमध्ये दोन तरुणांचे मृतदेह आढळले," अशी माहिती अग्निशमन दलाचे अधिकारी प्रदीपकुमार चौबे यांनी दिली. 

"सकाळची वेळ असल्याने रस्त्यावर फारसे लोक नव्हते. सोसायटीच्या सुरक्षारक्षकाने अग्निशमन दलाला माहिती दिली. मात्र अग्निशमन दलाचे जवान येईपर्यंत दोन्हीही जवान होरपळून मृत्युमुखी पडले होते. तरुणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आणि नंतर कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले," असं अतिरिक्त पोलीस उपायुक्त शक्ती अवस्थी यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, कारमधील एसी यंत्रणेत बिघाड होऊन शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.

Web Title: Engineer and his friend killed in Swift car fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.