पेटीतून पेपर चाेरणारा इंजिनीअर अटकेत; सीबीआयची झारखंडमध्ये कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 04:10 AM2024-07-17T04:10:43+5:302024-07-17T04:11:06+5:30
परीक्षेतील गैरप्रकारांबाबत सीबीआय तपास करीत असून आतापर्यंत बिहार, गुजरात, महाराष्ट्र, राजस्थानमध्ये सहा एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत.
नवी दिल्ली : वैद्यकीय पदवी पात्रता परीक्षा ‘नीट-यूजी’ पेपरफुटीप्रकरणी सीबीआयने एका प्रमुख आराेपीसह दाेन जणांना अटक केली. आराेपींनी झारखंडच्या हजारीबाग येथून ‘एनटीए’च्या पेटीतून पेपर चाेरल्याचा आराेप आहे. पेपरफुटीप्रकरणी अटक केलेल्या आराेपींची संख्या १४ झाली आहे.
पंकज कुमार आणि राजू सिंह अशी अटक केलेल्या आराेपींची नावे आहेत. पंकज याने जमशेदपूरच्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेतून (एनआयटी) सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतली असून, त्याने पेपर चाेरल्याचा आराेप आहे. ताे बाेकाराे येथील रहिवासी असून, त्याला पाटणा येथून अटक करण्यात आली. तर राजू सिंह याला हजारीबाग येथून अटक करण्यात आली. पेपर चाेरणे आणि टाेळीच्या इतर सदस्यांना ताे पुरविण्यात त्याने मदत केली हाेती, असा आराेप आहे.
परीक्षेतील गैरप्रकारांबाबत सीबीआय तपास करीत असून आतापर्यंत बिहार, गुजरात, महाराष्ट्र, राजस्थानमध्ये सहा एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत.