इंजिनिअरनं आधी पत्नीची माफी मागितली, पासवर्ड आणि बँक डिटेलही सांगितले; नंतर 15व्या मजल्यावरून मारली उडी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 12:11 PM2024-08-28T12:11:11+5:302024-08-28T12:11:24+5:30

आत्महत्येचे कारण जाणून घेण्यासाठी सेक्टर-113 पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून मृताच्या कुटुंबीयांनाही घटनेची माहिती देण्यात आली आहे.

engineer commits suicide after apologized to his wife, gave her passwords and bank details; Then jump from the 15th floor | इंजिनिअरनं आधी पत्नीची माफी मागितली, पासवर्ड आणि बँक डिटेलही सांगितले; नंतर 15व्या मजल्यावरून मारली उडी

इंजिनिअरनं आधी पत्नीची माफी मागितली, पासवर्ड आणि बँक डिटेलही सांगितले; नंतर 15व्या मजल्यावरून मारली उडी

उत्तर प्रदेशातील नोएडा सेक्टर-75 मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील पंचशील प्रतिष्ठा सोसायटीतील 15व्या मंजल्यावरील फ्लॅटच्या बालकनीतून उडी घेत आयटी इंजिनिअरने मंगळवारी आत्महत्या केली. पोलिसांना मृताकडून कसल्याही प्रकारची सुसाइड नोट मिळालेली नाही. आत्महत्येचे कारण जाणून घेण्यासाठी सेक्टर-113 पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून मृताच्या कुटुंबीयांनाही घटनेची माहिती देण्यात आली आहे.

एसीपी शैव्या गोयल यानी दिलेल्या माहिती नुसार, पंचशील प्रतिष्ठा सोसाइटीतील टॉवर क्रमांक आठच्या फ्लॅट क्रमांक 1508 मध्ये 36 वर्षीय पंकज पत्नी आणि मुलांसोबत राहत होते. मंगळवारी सायंकाळी 3 वाजण्याच्या सुमारास त्यांनी 15व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या  केली. कुणी तरी पडल्याचा आवाज ऐकूण सोसायटीचे सिक्योरिटी गार्ड धावत घटनास्थळी पोहोचले.  मात्र, तोवर पंकज यांचा मृत्यू झालेला होता.

पंकज सेक्टर-126 मधील एका कंपनीत आयटी इंजिनिअर होता. पोलीस सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमऱ्यांचे फुटेज खंगाळत आहेत. घटना घडली तेव्हा पंकजची पत्तनी जालंधर येथे गेलेली होती. त्यांच्या पत्नीलाही घटनेची माहिती देण्यात आली आहे. ती नोएडा कडे निघाली आहे.

मेल करत पत्नीला माफी मागीतली -
आत्महत्येपूर्वी पंकजने मेल आणि मेसेजच्या माध्यमाने पत्नीसोबत संवादही साधला होता. पंकजने मेलमध्ये आपल्या लॅपटॉपसह पासवर्ड आणि बँकेशी संबंधित डिटेल्सदेखील दिले आहेत. याशिवाय त्याने पत्नीला माफीही मागितली आहे. याप्रकरणी मृताच्या नातलगांकडून संबंधित पोलीस ठाण्यात कसल्याही प्रकारची तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. स्थानिक लोकांच्या म्हणण्याप्रमाणे, पंकज गेल्या काही दिवसांपासून डिप्रेशनची औषधीही घेत होता. तो पंजाब मधील जालंधर येथील मुळ निवासी होता.

Web Title: engineer commits suicide after apologized to his wife, gave her passwords and bank details; Then jump from the 15th floor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.