धक्कादायक! वर्क फ्रॉम होमच्या त्रासाला कंटाळून इंजिनिअरची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2020 12:07 PM2020-10-21T12:07:25+5:302020-10-21T12:15:17+5:30
Suicide Due To Work From Home : वर्क फ्रॉम होमच्या त्रासाला कंटाळून एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची भयंकर घटना समोर आली आहे.
देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. हातात काम नसल्याने अनेकांनी टोकाचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे काही जणांना वर्क फ्रॉम होमची सुविधा देण्यात आली आहे. मात्र काम करताना योग्य सुविधा नसल्याने अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच वर्क फ्रॉम होममुळे तणाव निर्माण झाला आहे. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
वर्क फ्रॉम होमच्या त्रासाला कंटाळून एका 32 वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. गुजरातमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअर असणाऱ्या या व्यक्तीने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. गेल्या कित्येक दिवसांपासून घरातून काम करताना होणारा त्रास सहन न झाल्याने त्याने आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे.
घरची परिस्थिती खूपच हलाखीची म्हणून घेतला टोकाचा निर्णयhttps://t.co/QmZSzXM1Lg#Crime
— Lokmat (@MiLOKMAT) October 15, 2020
वर्क फ्रॉम होममुळे तणाव
जिगर गांधी असं आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचं नाव असून तो नोएडा येथील एका कंपनीत गेल्या तीन वर्षांपासून काम करत होता. दोन महिन्यांपूर्वी तो घरी परतला होता आणि घरुनच काम करत होता. जिगरच्या कुटुंबियांनी पोलिसांना तो गेल्या काही दिवसांपासून घरून काम करावं लागत असल्याने किती तणाव असतो याबद्दल सांगत होता अशी माहिती दिली आहे. शवविच्छेदन अहलावात गळफास घेतल्याने जिगरचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
पोलीस या प्रकरणाचा करताहेत तपास
जिगरचा डिसेंबर महिन्यात साखरपुडा होणार असल्याची माहिती मिळत आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना पानीपतमध्ये घडली होती. नोकरी गेल्याने एका दाम्पत्याने आत्महत्या केल्याची भयंकर घटना समोर आली होती. धक्कादायक बाब म्हणजे एका महिन्यापूर्वीच त्यांचं लग्न झालं होतं. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. नवविवाहित दाम्पत्याने घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
धक्कादायक! कुटुंबीय आजोबांच्या मृत्यूची पाहत होते वाट पण तेवढ्यात झालं असं काही...; मन सुन्न करणारी घटनाhttps://t.co/NOM2ITXJEg
— Lokmat (@MiLOKMAT) October 14, 2020