३० किलो सोनं, ५ आलिशान गाड्या; अभियंत्याकडे सापडलं घबाड; अधिकारी मोजून मोजून दमले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2021 10:47 AM2021-07-02T10:47:35+5:302021-07-02T10:47:50+5:30

अभियंत्याच्या घरात सापडली उत्पन्नापेक्षा १४५० टक्के अधिक संपत्ती; अधिकारीदेखील चक्रावले

engineer raid rajasthan jaipur jodhpur and chittorgarh anti corruption bureau search-operation | ३० किलो सोनं, ५ आलिशान गाड्या; अभियंत्याकडे सापडलं घबाड; अधिकारी मोजून मोजून दमले

३० किलो सोनं, ५ आलिशान गाड्या; अभियंत्याकडे सापडलं घबाड; अधिकारी मोजून मोजून दमले

googlenewsNext

जयपूर: राजस्थानात भ्रष्टाचारविरोधी विभागाची धडक मोहीम सुरू आहे. या मोहिमेच्या अंतर्गत भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या जात आहेत. जयपूर, जोधपूर आणि चित्तोढगडमध्ये ३ अधिकाऱ्यांशी संबंधित १४ ठिकाणी छापे टाकण्यात आले. जयपूर विकास प्राधिकरणात (जेडीए )अभियंता असलेला निर्मल गोयलच्या घरी एसीबीच्या अधिकाऱ्यांना त्याच्या उत्पन्नाच्या १४५० टक्के अधिक संपत्ती सापडली आहे. 

जेडीएमध्ये अभियंता असलेल्या निर्मल गोयलचं वेतन दीड लाख रुपये आहे. मात्र जयपूरमधील मोक्याच्या ठिकाणी एका वसाहतीत त्याची चार आलिशान घरं आहेत. अधिकाऱ्यांना अभियंत्याच्या फार्म हाऊसमध्ये ३ लाख ८७ हजारांची रोकड, ३० किलो सोनं, २४५ युरो, २ हजार डॉलर, मर्सिडिझसह पाच महागड्या कार आढळून आल्या आहेत. तीन बँकांमध्ये अभियंत्याचे लॉकरदेखील आहेत. ते अद्याप उघडायचे आहेत.

जिल्हा परिवहन अधिकाऱ्याच्या घरावर छापा
चित्तौढगडमध्ये जिल्हा परिवहन अधिकारी मनीष शर्माजवळ दोन कोटींच्या गुंतवणुकीची कागदपत्रं सापडली आहेत. त्याच्या सदनिकेत एक लाखाची रोकड आणि परदेश प्रवासाची कागदपत्रं आढळून आली आहेत. अधिकाऱ्यांनी त्याच्या घराजवळून महागड्या दुचाकी आणि कारदेखील ताब्यात घेतल्या आहेत.

निरीक्षकाची संपत्ती उत्पन्नापेक्षा ३३३ टक्क्यांनी जास्त
जोधपूरमध्ये निरीक्षक प्रदीप शर्माच्या घरावर भ्रष्टाचार विरोधी विभागाच्या पथकानं छापा टाकला. शर्माच्या भोपाळ, बिकानेरमधील मालमत्तावरदेखील छापे टाकण्यात आले. त्यातून साडे चार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची माहिती समोर आली. ही संपत्ती त्याच्या उत्पन्नाच्या ३३३ टक्के अधिक आहे. सूरसागर ठाण्यात तैनात असलेल्या निरीक्षक प्रदीप शर्माची जोधपूर, भोपाळमध्ये जमीन असून त्याच्या मालकीची एक शाळा आणि तीन बसेसदेखील आहेत.

Web Title: engineer raid rajasthan jaipur jodhpur and chittorgarh anti corruption bureau search-operation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.