आईला भेटण्यासाठी अभियंत्याचा बाईकवरून सव्वादोन हजार किमी प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 04:25 AM2020-04-29T04:25:12+5:302020-04-29T04:25:23+5:30

अहमदाबादहून बाईकने २,३४ ६ किमीचा प्रवास करत तामिळनाडू गाठले. त्यासाठी त्यांना चार दिवस लागले.

The engineer traveled twenty-two thousand km by bike to meet his mother | आईला भेटण्यासाठी अभियंत्याचा बाईकवरून सव्वादोन हजार किमी प्रवास

आईला भेटण्यासाठी अभियंत्याचा बाईकवरून सव्वादोन हजार किमी प्रवास

googlenewsNext

श्रीविल्लीपुत्तुर : आजारी आईला लॉकडाऊनमुळे भेटणे अशक्य झाल्याने दिवसरात्र तळमळणाऱ्या व अहमदाबादमध्ये प्रॉजेक्ट इंजिनिअर म्हणून काम करणाºया एन. चंद्रमोहन (४३ वर्षे) यांनी एक धाडसी निर्णय घेतला. त्यांनी अहमदाबादहून बाईकने २,३४ ६ किमीचा प्रवास करत तामिळनाडू गाठले. त्यासाठी त्यांना चार दिवस लागले.
चंद्रमोहन यांच्या आईने काचबिंदूमुळे एक डोळा गमावला असून तिची प्रकृती बिघडली होती. तिचा एक मुलगा चेन्नई व मुलगी तिरुवन्नमलाई या ठिकाणी राहातात. लॉकडाऊनमुळे या दोघांनाही आपली आई राहात असलेल्या सिरकाझी गावाला जाणे शक्य होत नव्हते. आई एकटी पडली असेल या भावनेने आणखी अस्वस्थ झालेल्या चंद्रमोहन यांनी अहमदाबाद जिल्हा प्रशासनाकडून ई-पास मिळवून आपल्या बाईकवरून २२ एप्रिल रोजी तामिळनाडूच्या दिशेने कुच केले. वाटेत जंगलातून जाणारा रस्ता दिवसाढवळ््या पार करायचा, तसेच रात्री पेट्रोल पंप किंवा एखादे बरे ठिकाण बघून तिथे झोप काढायची असे त्यांनी ठरविले होते. आपल्या सॅकमध्ये बिस्किटांचे पुडे व पाण्याच्या बाटल्या भरून ते प्रवासाला निघाले. एका स्वयंसेवी संस्थेने प्रवासादरम्यान चंद्रमोहन यांची सकाळ व संध्याकाळच्या जेवणाची व्यवस्था केली होती. त्याच्या भरवशावर त्यांनी हा प्रवास पार पाडला. दिवसाला पंधरा तास ते बाईक चालवत असत. दर एक तासाने थांबून ते पाच मिनिटे विश्रांती घेत व मग मार्गस्थ होत. अखेर २५ एप्रिल रोजी रात्री साडेआठला वात्रपला आपल्या सासरी पोहोचले. वाटेमध्ये अनेक ठिकाणी पोलिसांनी त्यांना हटकले पण ई-पास असल्याने त्यांना कोणीही रोखले नाही .

Web Title: The engineer traveled twenty-two thousand km by bike to meet his mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.