एकाच दिवसात दोन विमानांची इंजिने हवेत बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 01:35 AM2023-08-31T01:35:55+5:302023-08-31T01:36:08+5:30

सुदैवाने वैमानिकांच्या समयसूचकतेमुळे दोन्ही विमाने सुरक्षितपणे उतरवण्यात आली.

Engines of two planes stopped mid-air in the same day | एकाच दिवसात दोन विमानांची इंजिने हवेत बंद

एकाच दिवसात दोन विमानांची इंजिने हवेत बंद

googlenewsNext

कोलकाता : इंडिगोच्या दोन विमानांचे इंजिन हवेतच बंद पडल्याचे प्रकरण समोर आले आहे. मंगळवारी (२८ ऑगस्ट) काही तासांतच इंडिगोच्या दोन वेगवेगळ्या विमानांचे प्रत्येकी एक इंजिन हवेत बंद पडले. सुदैवाने वैमानिकांच्या समयसूचकतेमुळे दोन्ही विमाने सुरक्षितपणे उतरवण्यात आली.

याप्रकरणी निवेदन जारी करताना विमान कंपनीने सांगितले की, पहिली घटना मदुराईहून मुंबईला जाणाऱ्या विमानात घडली. तर, दुसरी घटना कोलकाताहून बंगळुरूला जाणाऱ्या विमानात घडली. तांत्रिक बिघाडामुळे दोन्ही विमानांचे प्रत्येकी एक इंजिन हवेतच बंद पडले होते.

इंजिनमध्ये कमी तेलाचा इशारा दिला होता
विमान कंपनी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही विमानांनी सर्व सुरक्षा मानकांवर उतरत उड्डाण केले. 
कोलकाताहून बंगळुरूला जाणाऱ्या विमानाचे ‘प्रॅट अँड व्हिटनी’ क्रमांक २ चे इंजिन हवेत तांत्रिक बिघाडामुळे बंद पडले होते. विमान सुरक्षितपणे मुंबईत उतरवण्यात आले.
मदुराईहून मुंबईला जाणाऱ्या फ्लाइटच्या इंजिन क्रमांक १ मध्ये बिघाड झाला. उड्डाण करताना त्यात उच्च कंपन दिसून आले. तेलाच्या कमी दाबाचा इशाराही देण्यात आला होता. त्यानंतर ते बंद पडले.

Web Title: Engines of two planes stopped mid-air in the same day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :airplaneविमान