बुरहानला हुतात्मा होऊ देण्यास इंग्लंडचाही नकार

By admin | Published: July 6, 2017 01:58 PM2017-07-06T13:58:54+5:302017-07-06T14:32:30+5:30

भारत सरकारने केलेल्या तीव्र विरोधानंतर बर्मिंगहॅम सिटी कौन्सीलला बुरहान वानी दिवसाला दिलेली परवानगी रद्द करावी लागली आहे.

England refuses to allow Burhan to become martyr | बुरहानला हुतात्मा होऊ देण्यास इंग्लंडचाही नकार

बुरहानला हुतात्मा होऊ देण्यास इंग्लंडचाही नकार

Next

 ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि.6- भारत सरकारने केलेल्या तीव्र विरोधानंतर बर्मिंगहॅम सिटी कौन्सीलला बुरहान वानी दिवसाला दिलेली परवानगी रद्द करावी लागली आहे. हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेचा दहशतवादी बुरहानच्या मृत्युला एक वर्ष पुर्ण झाल्याबद्दल बर्मिंगहॅम शहरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारताने यावर नाराजी व्यक्त करुन त्यास तीव्र विरोध केला. त्यामुळे या कार्यक्रमाची परवानगी आता रद्द करण्यात आली आहे.
 
बुरहान वानीला भारतीय सुरक्षा दलांनी गेल्या वर्षी 8 जुलै रोजी कंठस्नान घातले होते. त्याच्या मृत्युला एक वर्ष पुर्ण झाल्याबद्दल बर्मिंगहॅममध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे त्यास बुरहान वानी डे असे नावही देण्यात आले होते. मात्र भारत सरकारने त्यास कडाडून विरोध केला आहे. भारताप्रमाणे इंग्लंडलाही दहशतवादाची झळ वारंवार बसली आहे. तीन दशकांहून अधिक काळ आयरिश रिपब्लिकन आर्मीने (आयआरए) इंग्लंडमध्ये विविध भागांमध्ये दहशतवादी हल्ले घडवून आणले होते. 1974 साली आयआरएने केलेल्या बॉम्बस्फोटांमध्ये बर्मिंगहॅममध्ये 21 जणांचे प्राण गेले होते. बर्मिंगहॅम पब बॉम्बिंग नावाने ही घटना ओळखली जाते. 1996 साली आयआरएने 1500 किलो स्फोटकांसह मॅंचेस्टरमध्ये केलेल्या स्फोटामध्ये 200 लोक गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर वर्षभरात पुन्हा मॅंचेस्टरमध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये 23 व्यक्तींचे प्राण गेले होते तर 259 लोक जखमी झाले होते.
लष्कराची मोठी कारवाई, सहा महिन्यात 92 दहशतवादी ठार
 
जम्मू काश्मीर : AK-47सहीत टेरिटोरियल आर्मीचा जवान बेपत्ता
 
2005 साली अल कायदाने केलेल्या स्फोटामध्ये 52 लोक ठार झाले होते. दहशतवादी हल्ल्यांची ही मालिका या 2017 पर्यंतदेखिल सुरुच आहे. यावर्षी ब्रिटिश संसदेजवळ खालिद मसूद या कारचालकाने पादचाऱ्यांवर गाडी चढवून 4 जणांना ठार केले होते आणि 50 जणांना जखमी केले. अशी पार्श्वभूमी असतानाही बर्मिंगहॅममध्ये बुरहान वानी डे ला परवानगी देण्यात आली. बर्मिंगहॅमच्या व्हिक्टोरिया स्क्वेअर येथे रॅलीही काढण्यात आली होती. बुरहानच्या चित्रांची पोस्टर्स आणि संदेश सोशल मीडियावरुन व्हायरल करण्यात आले होते." जे आमचं आहे ते सर्व शक्तीने आम्ही मिळवूच. काश्मीर स्वतंत्र करुन तेथे आमचा झेंडा फडकवूच" असा संदेश व्हायरल केला गेला होता. भारताचे इंग्लंडमधील उपउच्चायुक्त दिनेश पटनाईक यांनी या कार्यक्रमाच्या परवानगी विरोधात फॉरेन अॅंड कॉमनवेल्थ ऑफिसमध्ये तक्रार केली. भारतविरोधी संघटनांना लोकशाहीच्या नावाखाली येथे वाढू देणे कधीही योग्य नाही असे त्यांनी त्यामध्ये म्हटले आहे.
 

 

Web Title: England refuses to allow Burhan to become martyr

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.