शिक्षकेतर कर्मचा-यांसाठी ’इंग्लिश विंग्लिश’
By admin | Published: September 24, 2014 04:39 AM2014-09-24T04:39:26+5:302014-09-24T04:39:26+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांचे शिक्षण घेण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांपासून वाढत चालेले आहे.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांचे शिक्षण घेण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांपासून वाढत चालेले आहे. त्यात विद्यापीठाने अनेक परदेशी विद्यापीठांशी करार केले आहेत. त्यामुळे विद्यापीठाने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना इंग्रजी भाषेचे धडे देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. परिणामी विद्यापीठातील अधिकारीच नाही तर शिक्षकेतर कर्मचारीसुध्दा अस्खलित इंग्रजीमध्ये संवाद साधू शाकणार आहेत.
शैक्षणिक क्षेत्रातील एकूण कामगिरीमुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा देशात पाचवा आणि महाराष्ट्रात पहिला क्रमांक लागतो. तसेच जागतिक स्तरावर इंग्रजीभाषात संवादासाठी वापरली जाते. परदेशी विद्यार्थी व अधिकाऱ्यांशी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना सहज संवाद साधता यावा, यासाठी विद्यापीठातर्फे हे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आला आहे. सायंकाळी ६ ते रात्री ८ या वेळेत कर्मचाऱ्यांना हे धडे देण्यात येत आहेत़
विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्राचे संचालक डॉ.विजय खरे म्हणाले, विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या परदेशी विद्यार्थ्यांसाठीच केंद्रातर्फे इंग्रजी भाषेतील संवाद कौशल्यासाठी प्रशिक्षण वर्ग चालविला जात होता. आता विद्यापीठातील विद्यार्थ्यांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठीसुध्दा आठ आठवड्यांचा प्रशिक्षण वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षण वर्गासाठी प्रवेश घेतला असून त्यात सहाय्यक उपकुलसचिव आणि लिपीक यांचा समावेश आहे.
विद्यापीठाच्या महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक डॉ. व्ही. बी. गायकवाड म्हणाले, इंग्रजी भाषा अवगत असणे ही काळाजी गरज आहे.