महिलांच्या उत्साहाने बिहारच्या मतदानात वाढ

By admin | Published: October 13, 2015 04:17 AM2015-10-13T04:17:26+5:302015-10-13T04:17:26+5:30

बिहार विधानसभा निवडणुकीच्या सोमवारी पहिल्या टप्प्यात ४९ मतदारसंघांत झालेल्या मतदानात गेल्या वेळेपेक्षा सहा टक्क्यांनी वाढ झाली.

With the enthusiasm of women, Bihar's voting increased with enthusiasm | महिलांच्या उत्साहाने बिहारच्या मतदानात वाढ

महिलांच्या उत्साहाने बिहारच्या मतदानात वाढ

Next

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या सोमवारी पहिल्या टप्प्यात ४९ मतदारसंघांत झालेल्या मतदानात गेल्या वेळेपेक्षा सहा टक्क्यांनी वाढ झाली. महिलांनी मोठ्या प्रमाणात मतदानाचा हक्क बजावल्याने या नक्षल प्रभावित १० जिल्ह्यांमध्ये ५७ टक्के मतदान झाले. सगळ्या केंद्रांकडून अंतिम आकडेवारी आल्यावर मतदानात एक ते दोन टक्क्यांची वाढ होऊ शकेल.
>२०१०च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघांत ५०.८५% मतदान झाले होते.
२०१४च्या निवडणुकीत या ४९ जागांचा समावेश असलेल्या आठ लोकसभा मतदारसंघांत ५४ टक्के मतदान झाले.
आठ लोकसभेच्या या जागांपैकी सहा भाजपाने तर दोन राजदने जिंकल्या होत्या.
या पट्ट्यातील २७ जागांवर भाजपा
तर २२ जागांवर रालोआतील मित्रपक्ष लढत आहेत.

Web Title: With the enthusiasm of women, Bihar's voting increased with enthusiasm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.