संपूर्ण भाजपालाच कर्करोगाने पोखरले - खासदार भोला सिंह

By admin | Published: November 12, 2015 05:37 PM2015-11-12T17:37:43+5:302015-11-12T17:39:50+5:30

संपूर्ण भाजपालाच कर्करोगाने ग्रासले आहे व पक्षातून याचे उच्चाटन करण्याची गरज आहे असे सांगत भाजपा खासदार भोला सिंह यांनी पुन्हा एकदा पक्षनेतृत्वावर हल्लाबोल केला आहे.

The entire BJP got cancerous - MP Bhola Singh | संपूर्ण भाजपालाच कर्करोगाने पोखरले - खासदार भोला सिंह

संपूर्ण भाजपालाच कर्करोगाने पोखरले - खासदार भोला सिंह

Next

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. १२ -  बिहार विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपात पेटलेला अंतर्गत संघर्ष शमण्याची चिन्हे नाहीत. संपूर्ण भाजपालाच कर्करोगाने ग्रासले आहे व पक्षातून याचे उच्चाटन करण्याची गरज आहे असे सांगत भाजपा खासदार भोला सिंह यांनी पुन्हा एकदा पक्षनेतृत्वावर हल्लाबोल केला आहे. 

बिहारमधील भाजपाच्या पराभवानंतर नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या कार्यपद्धतीवर पक्षांतूनच उघडपणे नाराजी व्यक्त होत आहे. भाजपा खासदार भोला सिंह यांनी एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीशी बोलताना पुन्हा एकदा पक्षनेतृत्वावर टीकास्त्र सोडले. सर्व निर्णय स्वतःच घेणा-या अमित शहा यांनी बिहारमधील पराभवावर स्पष्टीकरण द्यावे. हे शक्य नसेल तर त्यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा असे सिंह यांनी म्हटले आहे. अमित शहा हे कोण आहेत, ते व पंतप्रधान आज जे आहेत ते आम्ही सर्व शक्तिनीशी त्यांच्यावर विश्वास दाखवल्यामुळेच आहेत असेही त्यांनी नमूद केले. सिंह यांनी दोन दिवसापूर्वीही अमित शहांवर टीका केली होती. त्यामुळे आता सिंह यांच्यावर भाजपाकडून कारवाई होते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Web Title: The entire BJP got cancerous - MP Bhola Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.