लडाखमध्ये कोरोनाची भीती वाढली; अनेक गावे देखरेखीखाली, मशिदींमधील नमाजही बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 06:58 PM2020-03-18T18:58:14+5:302020-03-18T19:13:11+5:30
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या भागात अनेक कोरोनाची लागण झाल्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर त्यांचे सॅम्पल्सदेखील तपासनीसाठी पाठवण्यात आले आहेत. लडाखमध्ये आतापर्यंत 8 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या दहशतीमुळे केंद्र शासित प्रदेश असलेल्या लडाखमधील एक भाग पूर्णपणे देखरेखीखाली ठेवण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या निर्देशानंतर कारगिल सांकू आणि जवळपासची सर्व गावे विशेष देखरेखीखाली ठेवण्यात आली आहेत.
या भागात एकाला कोरोनाची लागण झाल्यानंतर सतर्कता म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या भागात अनेक कोरोनाची लागण झाल्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर त्यांचे सॅम्पल्सदेखील तपासनीसाठी पाठवण्यात आले आहेत. लडाखमध्ये आतापर्यंत 8 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
व्हायरस पसरूनये म्हणून घेण्यात आला निर्णय -
कारगिलच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे, की 'कोरोनाचा अधिक प्रमाणावर फैलाव होऊ नये. तसेच बाधितांची आणि मृतांची संख्या वाढूनये म्हणून हा भाग देखरेखीखाली ठेवण्यात आला आहे.'
लडाखमध्ये कोरोना ग्रस्तांच्या संख्येत वाढ होत आहे. नुकताच लेहमध्ये एका भारतीय जवानालाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या जवानासंबंधी अधिक माहिती मिळालेली नाही. मात्र, त्याचे वडील इराणवरून भारतात परतले होते. त्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समजते. सुदैवाने हा जवान सुट्टीवर असल्याने इतर जवानांच्या संपर्कात नव्हता.
कारगिलमध्ये मशिदींमध्ये नमाजही बंद -
येथील प्रशासनाने कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. येथील शाळा, महाविद्यालये बंद ठेवली आहेत. तसेच 'अंजुमन जमीयत उलामा इसना अशरिया करगिल, लडाख'नेही कोरोनाचा धोका लक्षात घेता मशिदींमधील नमाज बंद केली आहे.
दोशातील कोरोनाबाधितांचा आकडा 150 वर
देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. भारतातील रुग्णांची संख्या 150वर पोहोचली आहे. दिल्लीपासून केरळपर्यंत पसरलेल्या या रोगाने पश्चिम बंगालमध्येही हात-पाय पसरायला सुरुवात केली आहे. कोलकात्यातही कोरोना संक्रमित पहिला रुग्ण आढळला आहे.